मोबाइलला या प्रकारे सेनेटाइझरने स्वच्छ करा

शुक्रवार, 24 एप्रिल 2020 (12:26 IST)
आपण आपल्या फोनचे नियमाने उपयोग करीत असता. ऑनलाईन शॉपिंग सूची बघत असाल, कॉलचे उत्तर द्यावयाचे असेल, बातम्या वाचायचा असेल, कुठलेही व्हिडियो बघावयाचे असेल तर आपण मोबाइलला हाताळता. संशोधनात असं आढळून आले आहे, की कोरोनाचे विषाणू काही पृष्ठभागावरचं जगू शकतात. 
 
आपल्या मोबाइलच्या स्क्रीनवर जाऊन व्हायरस एकाच ठिकाणी जाऊन बसतात. आपण वारंवार हात धुऊन व्हायरसपासून वाचू शकता पण पुन्हा आपण मोबाइल हाताळ्यावर व्हायरस आपल्या हातांवर जाऊन बसतात. या साठी आपल्या फोनला स्वच्छ करणे खूप महत्त्वाचे आहे.
 
मोबाइलला स्वच्छ करण्यासाठी आपण क्लोरॅक्स पत्र (शीट) वापरू शकता. अँपल ने आपल्या संकेतस्थळावर हे सांगितले आहे की मोबाइलला स्वच्छ करण्यासाठी आपण क्लोरॅक्स शीट चा वापर करून आपल्या मोबाइलला सुरक्षित ठेवू शकता.
 
यासह, सॅमसंगने त्यांच्या वेबसाइटवर असेही म्हटले आहे की आपण अल्कोहल आधारित सोल्युशन (70%) वापरू शकतात. यासाठी आपण मायक्रोफायबरचा कापड्याचा वापर करू शकता. सोल्युशन थेट मोबाइलला न वापरण्याची खबरदारी घ्यावी. सोल्युशनला मायक्रोफायबरच्या कापड्यावर टाकून मग हळुवार हाताने स्वच्छ करावे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती