रिकाम्यापोटी बेदाण्याचे पाणी प्यायल्यास होतील हे फायदे
* द्राक्षांना सुकवून बेदाणे / किसमिस बनवले जातात. त्यामध्ये आयर्न, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फायबर घटक मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे आरोग्यासाठी द्राक्ष फायदेशीर आहेत. बेदाणांप्रमाणेच त्याचे पाणीदेखील आरोग्यदायी आहे.
* बेदाणांमध्ये नैसर्गिकरीत्या साखर मुबलक प्रमाणात असल्याने रात्रभर बेदाणे पाण्यात भिजत ठेवा. यामुळे साखरेचा अंश कमी होऊन न्यूट्रिशनल व्हॅल्यू वाढते.
* बेदाण्यांमुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. त्याचे पाणी टॉक्सिन घटक बाहेर टाकण्यास मदत करते.
* बेदाण्यांमधील फायबर घटक पचन संस्थेला चालाना देण्यास मदत करतात. यामुळे पचन सुधारते.
* बेदाण्यांमध्ये अॅन्टीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. यामुळे घशातील इंफेक्शन, तोंडाला येणारी दुर्गंधी कमी होते.
* बेदाण्यांमध्ये कॅल्शियम आणि मायक्रो न्यूट्रीएंट्स असतात. यामुळे हाडांना मजबुती मिळते.
* बेदाण्यांमधील आयर्न घटक अॅनिमियाच्या रूग्णांना फायदेशीर ठरते. यामुळे शरीरात रक्त वाढण्यास मदत होते.
* फायबरसह बेदाण्यांमध्ये असलेले अनेक आवश्यक पोषकघटक शरीरातील कोलेस्ट्रेरॉलची पातळी सुधारण्यास मदत करते. त्यामुळे हृदयाचे विकार असणार्यांसाठी बेदाणे फायदेशीर ठरतात.
* कसा कराल उपाय - कपभर गरम पाण्यामध्ये मूठभर स्वच्छ धुतलेले बेदाणे भिजत ठेवा. सकाळी हे पाणी थोडे गरम करून प्यावे. त्यानंतर बेदाणेदेखील चावून खावेत.