'मिटरेसी' कुळातील सदापर्णी, सुगंधी, उंच अशा वनस्पतींपैकी निलगिरी ही उबदार प्रदेशातील वनस्पती आहे. या वनस्पतीपासून सुगंधी द्रव्योद्योग तेले, औद्योगिक तेले, औषधी तेले तयार केली जातात.
निलगिरीचा उपयोग अतिसार, जुनाट अमांश, कापणे, दंतवैद्यकीय औषधे इत्यादीत केला जातो.
श्वासनलिकेच्या वरच्या भागात संसर्गजन्य विकार आणि काही कातडीचे रोग यांवर निलगिरी तेल उपयुक्त सिद्ध होते. पाणथळ जागेत, सांडपाण्याच्या दलदलीच्या जागेत निलगिरीची झाडे लावतात.