मोसंबी हे फळ मूळचे भारतीय नव्हे. मोझांबिक बेटाचे नावावरून याला मोसंबी हे नाव पडले असले तरी याचे मूळ स्थान चीन आहे. या फळाचा रस चवीला मधुर, पाच्य (पचावयास हलका) पण कफकारक असला तरी शक्तिवर्धक, भूक व तृषाशामक आहे. थोडी मिरपूड व मीठ लावून घेण्याने कफाचा प्रादुर्भाव होत नाही. काही वेळेस रस कोमट करून घेण्याचा वैद्य सल्ला देतात. दीर्घ आजारात शक्ती भरून येण्यासाठी तसेच जेव्हा पचनयंत्रणा कमकुवत झालेली असते; अशावेळी या रसाचा सातत्याने उपयोग केला जातो.
बस, ट्रेन, बोट लागण्याची सवय असल्यास प्रवासात अधूनमधून साल काढून कापटी चोखत राहावे; त्रास जाणवत नाही.
कफ प्रकृतीचे व्यक्तींना शक्तिवर्धक म्हणून रस घेणे असल्यास गरम करून, ग्लासभर रसात 2 चमचे आल्याचा रस टाकून घ्यावा, कफाचा प्रादुर्भाव होत नाही.