अकाली पडणार्या सुरकुत्या हा महिलांच्या दृष्टीने चिंतेचा विषय ठरतो. वयानुरुप त्वचेचं सौंदर्य बाधित होत असतं. वाढत्या वयाचे परिणाम दिसत असतात. हा निसर्गाचा नियम आहे. पण अकाली पडणार्या सुरकुत्या मात्र नकोशा वाटतात. त्या सौंदर्य आणि आरोग्य या दोघांवर परिणाम दाखवतात. म्हणूनच ही नकोशी बाब टाळण्यासाठी त्वचा अधिकाधिक काळ तरूण राखणं आणि त्यासाठी काही उपाय योजणं आवश्यक ठरतं. अकाली सुरकुत्या पडल्यावर उपचार करण्यापेक्षा त्या पडू नयेत याची काळजी घेणं जास्त चांगलं. का पडतात अकाली सुरकुत्या, पाहू या...
* मोबाइलचा वापर- संशोधकांच्या एका गटाने केलेल्या संशोधनानुसार सुरकुत्या पडण्यामागे मोबाइलमधून निघणार्यार लहरीदेखील कारणीभूत असतात. म्हणूनच रात्री झोपताना मोबाइल दूर ठेवायला हवा. तो उशीखाली, चेहर्यालजवळ नसावा.
* चहा - कॉफीचं मर्यादित सेवन - तुम्ही अतिरिक्त प्रमाणात चहा-कॉफीचं सेवन करत असाल तर त्वचेवर अकाली सुरकुत्या पडण्याची शक्यता अनेकपटीने वाढते असं तज्ज्ञ सांगतात. या पेयांच्या सेवनाने त्वचेतील पाणी कमी होतं आणि ओलावा नाहिशा झालेल्या रुक्ष त्वचेवर अकाली सुरकुत्यांचा धोका वाढतो. म्हणूनच चहा-कॉफीचं सेवन केल्यानंतर काही काळाने ग्लासभर पाणी प्यावं.