परीक्षेवेळी काय खावे काय नाही, जाणून घ्या ?

शनिवार, 2 मार्च 2019 (11:23 IST)
परीक्षेचे दिवस चालू आहे अशात भूक- तहान विसरून अभ्यास करत राहणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. यावेळी योग्य आहार घेतला पाहिजे.
 
या दिवसांमध्ये फास्ट फूड खाणे टाळा. याने चित्त एक्राग होण्यास मदत होईल. लिक्विड पदार्थांचे सेवन करावे.
 
* हेल्थी फूडने स्मरण शक्ती वाढते. त्यामुळे कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी असलेले फूड सेवन करावे.
 
* खाण्यात अंतर कमी असला पाहिजे. अधून-मधून दाणे, मखाणे, चणे, पॉपकार्न असे पदार्थ एक-दोन तोंडात टाकत राहावे.
 
* या दिवसांमध्ये दूध, दही, अंडी भरपूर मात्रेत घ्यावे.
 
* घरी तयार केलेली भेल, टोस्ट, पनीर, सलाड, मध, सुखे मेवे सेवन करावे.
 
* चहाऐवजी फलांचा रस, लिंबू पाणी घेणे योग्य राहील. चहाची सवय असेल तर हर्बल टी घेणेही फायद्याचे ठरेल.
 
* लंचमध्ये कडधान्य, सलाड, विविध डाळी आहारात सामील करायला हवं.
 
* रात्रीच्या वेळी सांजा, कॉर्न किंवा साधी फोडणी दिलेली भाजी-पोळी खाणे योग्य ठरेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती