हा ताप विषाणूजन्य असल्यामुळे एका व्यक्तीकडून दुसऱ्या कडे ताबडतोब पसरतो .
हे टाळण्यासाठी घरगुती उपाय जाणून घ्या-
1 हळदी आणि सुंठ पूड -सुंठ म्हणजेच आल्याची पूड आणि आल्यामध्ये ताप बरे करण्याचे गुणधर्म असतात.या साठी एक चमचा काळीमिरपुडीत एक लहान चमचा हळद,एक चमचा सुंठ पूड आणि साखर मिसळा.हे सर्व साहित्य एक कप पाण्यात घालून गरम करा नंतर थंड करून पिऊन घ्या.असं केल्याने व्हायरल तापाचा नायनाट होईल.
2 तुळशीचा वापर-तुळशीत अँटिबायोटिक गुणधर्म असतात या मुळे शरीरातील विषाणू नाहीसे होतात.या साठी एक चमचा लवंगाच्या पूड मध्ये 10 ते 12 ताजी पाने तुळशीची मिसळा.आता हे 1 लिटर पाण्यात घालून चांगल्या प्रकारे उकळवून घ्या.हे पाणी अर्ध करा.आता हे पाणी गाळून दर एका तासाने प्यावं.असं केल्याने व्हायरल ताप नाहीसा होईल.