या 4 लोकांनी चिंच खाऊ नये, आरोग्याची हानी होऊ शकते

Imli Side Effects चिंच हे नाव घेताच तोंडाला पाणी सुटतं. आंबट-गोड चिंच आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. खाद्य पदार्थांची चव वाढवण्यासाठी अनेक प्रकारच्या पाककृतींमध्ये चिंचेचा वापर केला जातो. चिंचेमध्ये प्रोटीन, फायबर, कार्बोहायड्रेट्स, फोलेट, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, ई, के, बी6, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह यांसारखे पोषक घटक असतात. ज्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळू शकतात. पण तुम्हाला माहित आहे का की चिंचेचे जास्त सेवन करणे देखील आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या लोकांनी चिंच खाऊ नये.
 
या 4 लोकांनी चिंच खाऊ नये These 4 People Should Not Eat Tamarind
डायबिटीज- डायबिटीजच्या रुग्णांनी चिंचेचे सेवन करू नये. विशेषत: जेव्हा तुम्ही कोणतेही औषध घेत असाल तेव्हा चिंचेचे सेवन टाळा.
 
एलर्जी- चिंच खाल्ल्याने अनेकांना एलर्जीची समस्या होऊ शकते. म्हणून जर आपल्याला चिंच खाल्ल्यावर त्वचेवर चट्टे किंवा खाज, तसेच उल्टी या सारख्या समस्यांना सामोरा जावं लागत असेल तर याचे सेवन लगेच बंद करा.
 
दातांना नुकसान- चिंचेत एसिडिक घटक आढळतात याने दातांचा पृष्ठभाग खराब होतो. त्यामुळे चिंचेचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे. जर तुम्हाला दातांची समस्या असेल तर चिंचेचे सेवन करू नका.
 
गर्भवती महिला- गर्भवती स्त्रियांना या दरम्यान आंबट वस्तू खाण्याची इच्छा होते मात्र अधिक प्रमाणात चिंच खाल्ल्याने गर्भवती स्त्रियांना नुकसान होऊ शकतं. अशात या गोष्टी खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
 
अस्वीकरण: ही सल्ला देणारी सामग्री केवळ सामान्य माहिती प्रदान करते. हे कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय मताचा पर्याय नाही. अधिक माहितीसाठी नेहमी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेबदुनिया या माहितीची जबाबदारी घेत नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती