Light experiments to look slim स्लिम दिसण्यासाठी हलके-फुलके फंडे

शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2023 (09:44 IST)
Light experiments to look slim फिट राहणसाठी जिमला जाणं, व्यायाम करणं ही चांगली कृती असते, पण एका रात्रीत कोणी स्लिम होत नाही. मग काही महत्त्वाच्या दिवशी आपल्याला बारीक दिसायचं असतं. आपल्या राहणीमानाकडे थोडं लक्ष दिलं तर आपला लूक थोडा स्लिम करू शकता.
 
खूप टाइट कपड्यांपासून वाचा - टाइट आणि स्किन फिट कपडे वापरू नका. याचा अर्थ असा नाही की आपण ओव्हरसाइज कपडे वापरावेत. थोडे ढिले कपडे घालावेत, ज्यामुळे पोट बाहेर दिसणार नाही आणि खूप हेवी पर्सनॅलिटी वाटणार नाही.
 
कमी झोप टाळा - संशोधनानुसार जे लोक 8 तासांहून कमी वेळ झोपतात त्यांच्यात स्थूलपणा वाढण्याची शक्यता जास्त असते. कमी झोपेचा परिणाम भुकेवर नियंत्रण ठेवणार्‍या हार्मोन्स घ्रेलिन आणि लॅप्टिनवर होतो. कमी   झोप झाल्यास ते असंतुलित होतात. जर आपण आपलं वजन नियंत्रणात ठेवू इच्छितात तर रात्रीची झोप पूर्ण आणि शांत झोप घ्या.
 
ब्राइट कलर्सपासून दूर राहा - तुम्हाला जर ब्राइट कलर्स आवडत असतील तर त्यापासून जरा दूर राहणं सुरू करा. थोडे सोबर आणि डल कलर्समध्ये आपण अपेक्षेपेक्षा कमी लठ्ठ वाटाल. प्लेन कपड्यांऐवजी लाइन्स किंवा चेक्स प्रिंटचा वापर करा.
 
लो वेस्ट जीन्स घालू नका - फॅशनच्या जगात आपणही आंधळे होऊन लो वेस्ट जीन्स सारखे प्रयोग करतो. पण त्यापासून दूर राहा. लो वेस्ट जीन्स घातल्यानं कमरेखालचा भाग अधिकच हेवी दिसेल. अधिक फॅशनेबल दिसणपेक्षा साधेपणावर भर द्या, त्याने आपण बारीक दिसाल.
 
पॉकेटवर लक्ष द्या - अनेकांना सवय असते पॅन्टच्या खिशात खूप काही वस्तू भरून ठेवतात. जर आपण लठ्ठ असाल तर ही सवय बदला. पॅन्टच्या खिशात अधिक सामान ठेवल्यानं आपलं पाकिट कपड्यांची मजा कमी करतं आणि लूक अधिक लठ्ठ दिसतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती