उन्हाळ्यात या 4 आजारांचा जास्त धोका असतो,काळजी घ्या

सोमवार, 17 मे 2021 (17:57 IST)
उन्हाळाचा हंगाम बऱ्याच लोकांना आवडतो. या हंगामात थंड खायला मिळत. एसी किंवा कुलरच्या थंड हवेत आनंद घेता येतो. परंतु आपल्याला हे ,माहित आहे का ,की उन्हाळ्याचा हंगाम जेवढे मजे देतो, आपल्यासह भरपूर आजार देखील घेऊन येतो. थोडं देखील निष्काळजीपणा करणे आपल्या जीवेनिशी येऊ शकत. चला जाणून घेऊ या की या हंगामात कोणते आजार होऊ शकतात.   
 
1 उन्हाळ्यात आपल्याला उष्माघाताची समस्या होऊ शकते. दिवसभर उन्हात  जास्त प्रमाणात फिरल्यामुळे उष्माघात देखील होऊ शकतो. यामुळे अशक्तपणा, डोकेदुखी, ताप, पाचन तंत्रात बिगाड होण्या सारख्या समस्या उद्भवू लागतात.
 
2 बरेच लोक हे विचार करून पाणी पीत नाही की त्यांना तहान लागलेली नाही .परंतु अशी चूक करू नका.शरीरात पाण्याचे निर्जलीकरणामुळे आपली तब्बेत बिगडू शकते. या स्थितीत ग्लूकोज ची बाटली देखील लावावी लागू शकते. म्हणून,लक्षात ठेवा की जरी तहान लागली नाही तरीही पाणी पीत राहा. दिवसातून एकदा ग्लूकोजचे पाणी आवर्जून प्या.  
 
3 अन्न विषबाधा होण्याची समस्या बर्‍याचदा आणि उन्हाळ्यात लवकर उद्भवते. म्हणून रात्री  कधीही उशिरा जेवण करू नये. सकाळी कधीही रात्रीचे शिळे अन्न खाऊ नका, बाहेरचे खाणे टाळा. आपल्याला अस्वस्थ वाटत असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.
 
4 उन्हाळ्यात सूर्य प्रकाशाने त्वचा जळते.लाल पुरळ होतात. म्हणून आपण सनस्क्रीन लावूनच बाहेर पडावे किंवा हाताला आणि तोंडाला बांधूनच बाहेर पडावे. जेणे करून आपल्याला काही त्रास होणार नाही. 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती