पुदिन्याचे 10 आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

रविवार, 16 मे 2021 (16:44 IST)
पुदिन्याचा वापर चव आणि औषधी गुणांसाठी कधीही केला जाऊ शकतो. परंतु आपल्या थंड प्रकृती आणि गुणधर्मामुळे याचा वापर उन्हाळ्यात जास्त करतात.यांचे अनेक फायदे मिळतात. चला याचे 10 आरोग्यदायी फायदे जाणून घेऊ या. 
 
1पोटाची उष्णता कमी करण्यासाठी पुदीना वापरणे खूप फायदेशीर आहे. या व्यतिरिक्त पोटाशी संबंधित इतर समस्यांपासून मुक्त होण्यासाठी देखील हे फायदेशीर आहे. या मुळे कोणतेही दुष्परिणामही होत नाही.
 
2 दिवसभर बाहेर लोक राहतात त्यांना तळपायात जळजळ होण्याची तक्रार असते.अशा परिस्थितीत फ्रीजमध्ये ठेवलेला पुदीना वाटून त्वरित आराम मिळण्यासाठी तळपायावर लावा. यामुळे पायांची उष्णता देखील कमी होईल.
 
3 कोरडे किंवा ओला पुदिना  ताक, दही, कच्च्या कैरी च्या पन्हात  मिसळून, प्यायल्याने पोटातील जळजळ पासून आराम मिळेल  आणि थंडावा मिळेल. तसेच गरम वार आणि उष्माघातापासून संरक्षण मिळेल.
 
4 आपल्याला टॉन्सिल्स आणि यामध्ये येणाऱ्या सूज ची तक्रार असल्यास पुदिनाच्या रसात साध पाणी घालून या पाण्याने गुळणे करा. हे फायदेकारी ठरेल.
 
5 उन्हाळ्यात पुदिना चटणीचा दर रोज वापर केल्याने आरोग्याशी संबंधित बरेच फायदे मिळतात. पुदिना,काळी मिरपूड, हिंग,सेंधव  मीठ,मनुके, जिरे, खजूर आणि खारीक मिसळून चटणी बनवून घ्या. ही चटणी पोटातील अनेक आजारांपासून बचाव करते आणि खायलाही चविष्ट असते. भूक नसल्यावर किंवा खाण्यात अरुची असल्यास ही चटणी खाल्ल्यावर भूक वाढवते. 
 
6 पुदीना आणि आल्याचा रस थोडासा मध मिसळून चाटण घेतल्याने खोकला बरा होतो.
 
7 पुदिन्याच्या पानांचा लेप लावल्याने अनेक प्रकारचे त्वचेचे आजार दूर होतात. जखम भरण्यासाठी देखील हे उत्तम उपचार आहे. 
 
8 पुदीना नियमितपणे  सेवन केल्याने कावीळ यासारख्या आजारांपासून आपले रक्षण होते. त्याचबरोबर, पुदीनाचा वापर मूत्रमार्गाच्या आजारासाठी देखील खूप उपयुक्त आहे. पुदीनाची पाने  वाटून पाणी आणि लिंबाचा रसासह प्यायल्याने शरीरातील आंतरिक स्वच्छता होते.
 
9 वारंवार हिचकीचा त्रास होत असेल तर पुदीनामध्ये साखर घालून हळू हळू चावा. काहीच वेळात हीचकी पासून मुक्तता मिळेल. 
 
10 या व्यतिरिक्त उन्हाळ्यात पुदीनाची पेस्ट चेहर्‍यावर लावल्याने  त्वचेची  उष्णता कमी होईल आणि आपल्याला फ्रेश वाटेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती