जेवणावर तुमच्या शरीराची शक्ती केंद्रीत असते. व्हिटॉमिन बी, मॅग्नेशियम, पोटेशियम आणि लोहयुक्त जेवणाने ताकद वाढते. म्हणून जेवणात अन्न, फळे आणि भाज्यांचे प्रमाण वाढवावे. चॉकलेट, मांस, अल्कोहल व कॅफीनयुक्त पदार्थ खाणे टाळावे.
शरीराला मॉलिश केल्यानेसुद्धा आळस दूर होतो.
थकवा दूर करण्यासाठी तणावमुक्त राहणे गरजेचे आहे. तणावामुळे शरीराची उर्जा संपते व थकवा येतो. हा व्यायाम करून पहा : दीर्घ श्वास घ्या. काही सेकंदापर्यंत श्वास रोखून ठेवा व नंतर सोडून द्या. काही मिनिटे असेच करा.
रंगांचा सुद्धा जीवनावर प्रभाव पडतो. नारंगी, लाल, पिवळा आणि डार्क हिरवा रंग मनाला तजेला देतात. त्यामुळे प्रसन्न वाटते.