ब्रेकफास्ट
वर्किंग वूमन्सने ब्रेकफास्ट स्किप नको करायला. घरातून निघण्याआधी आपण दूध, सांजा, कॉर्नफ्लेक्स किंवा सँडविच घ्या. सकाळच्या नाश्त्यात विटामिन ए युक्त फळं जसे शेवफळ, पपई आणि स्ट्राबेरी खाणे फायदेशीर ठरेल. ब्रेकफास्टसाठी वेळ नसल्यास एक ग्लास दुधाबरोबर कोणतंही फळ घ्यावं. याबरोबरचं थोडेसे ड्रायफूट्स आपल्याजवळ ठेवावे.
लंच
वर्किंग वूमन्सच्या ब्रेकफास्ट आणि लंच यात चार ते पाच तासांचा अंतर हवा. लंचमध्ये भाजी, डाळ, दही, भात आणि पोळीचा समावेश करा. हिरव्या भाज्या जसे ब्रोकोली, पालक, मेथी व इतर आहारात सामील करा. याव्यतिरिक्त पनीर भुजिया किंवा एग भुजिया पण घेऊ शकता. लंचमध्ये सॅलेड किंवा कोशिंबीर घ्या.