Health Benefits Of Rock Salt: सैंधव मीठ हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. सैंधव मीठ पांढरे आणि गुलाबी रंगाचे असून ते सर्वात शुद्ध मीठ मानले जाते. उपवासाच्या वेळी हे सर्वात जास्त खाल्ले जाते. सैंधव मीठ गुलाबी मीठ, हिमालयीन मीठ, रॉक मीठ, लाहोरी मीठ किंवा हॅलाइड सोडियम क्लोराईड म्हणून देखील ओळखले जाते. खनिजे, लोह, जस्त, मॅग्नेशियम आणि पोषक घटक रॉक सॉल्टमध्ये आढळतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. आहारात सैंधव मिठाचा समावेश करून तुम्ही शरीराला अनेक आरोग्य समस्यांपासून वाचवू शकता. सैंधव मिठाच्या सेवनाने त्वचा निरोगी ठेवता येते. इतकंच नाही तर बद्धकोष्ठता आणि लठ्ठपणाही याच्या सेवनाने आटोक्यात ठेवता येतो. चला तर मग आज आम्ही तुम्हाला सैंधव मीठ खाण्याचे फायदे सांगत आहोत.
एनर्जी: जर शरीरातील एनर्जी लेव्हल बर्याचदा कमी होत असेल तर रॉक मिठाचे सेवन करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. खनिजे, लोह, जस्त, मॅग्नेशियम आणि पोषक घटक रॉक मिठामध्ये आढळतात, जे ऊर्जा देण्याचे काम करू शकतात.
ताणतणाव: सेरोटोनिन आणि मेलाटोनिन हार्मोन्स रॉक मिठाच्या नियमित वापरामुळे संतुलित होतात, ज्यामुळे तणाव आपल्यावर हावी होत नाही, म्हणजेच आपण तणावाची समस्या टाळू शकतो.