विक्सचे गुण, वेदनासह त्वचेवरील डाग देखील घालवण्यात फायदेशीर

शनिवार, 24 ऑक्टोबर 2020 (14:52 IST)
सर्दी पडसं हे हंगामात बदल झाले की होणारच. सर्दी झाल्यावर आपले नाक बंद होत, श्वास घेण्यास ही त्रास होऊ लागतो. काहीच सुचत नाही. रात्री व्यवस्थित झोप सुद्धा लागत नाही. अशा परिस्थितीत काय करावं सुचतच नाही. साधारण सर्दी पडसंमध्ये आपले आणि माझे आपल्या सर्वांचे सहकारी असणारे विक्स..
 
विक्स व्हॅपोरब ज्याचा वापर करून आपण आपल्या बंद झालेल्या नाकाला उघडतो. पण आपल्याला माहीत आहे का की या विक्स चे बंद नाक उघडण्या व्यतिरिक्त इतर फायदे देखील आहे. जे आपणास माहीत नसणार. चला तर मग त्या 7 फायद्यांबद्दल जाणून घेऊ या.
 
1 स्ट्रेच मार्क्स - स्ट्रेच मार्क्स आपल्या त्वचेच्या घट्ट पणा कमी होणे आणि सरत्या वयाच्या लक्षणांमुळे दिसून येतात. विशेषतः गरोदरपणात स्ट्रेच मार्क्स होणं हे स्वाभाविकच आहे. पण त्यांना सहजपणे रोखणाचा मार्ग आहे विक्स व्हॅपोरब, होय विक्स व्हॅपोरब. या मध्ये वापरले जाणारे घटक जसं की नीलगिरी तेल, देवदाराच्या पानाचे तेल, पेट्रोलॅटम, कापूर, इत्यादींचे मिश्रण त्वचेला मऊ बनवतं आणि मॉइश्चराइझ बनवून ठेवत. हे स्ट्रेच मार्क्स कमी करण्यात फायदेशीर असतं.
 
2 ओरखडा - कोणत्याही प्रकाराचा ओरखडा आल्यावर विक्स फार प्रभावी असतं. आपल्या ला फक्त हेच करावयाचे आहे की विक्स मध्ये थोडंसं मीठ घालून हे मिश्रण त्या जागेवर लावून हळुवार हाताने चोळायचे आहे.
 
3 टाचांना भेगा पडलेल्या असल्यास -भेगा असलेल्या टाचांना सुंदर आणि मऊ बनवण्यासाठी आपण विक्सचा वापर करू शकता. आपल्याला फक्त हे करावयाचे आहे की रात्री झोपण्यापूर्वी टाचांना थोडं विक्स लावा आणि वरून सुती मोजे घालून घ्या. हे लक्षात असू द्या की आपल्याला पायांना कोमट पाण्याने धुवायचे आहे. आपली इच्छा असल्यास आपण प्युमिक दगडाने देखील घासून मृत त्वचा देखील स्वच्छ करू शकता. 
 
4 डोकंदुखी आणि मायग्रेन - डोकंदुखीसाठी विक्स जादू प्रमाणे प्रभावी आहे. ते फक्त कपाळी लावावं आणि काही वेळ तसेच राहू द्या. थोड्याच वेळात आपल्याला वेदने पासून आराम मिळेल.
 
5 कान दुखी - कानात दुखत असल्यास आपण विक्सचा वापर करू शकता. कापसाच्या बोळ्यावर थोडंसं विक्स व्हॅपोरब चोळा आणि या बोळ्याला काही तासांसाठी कानात लावून ठेवावं. असे दिवसातून दोन ते तीन वेळा करावं. या मुळे कानाच दुखणं कमी होईल, तसेच कानाच्या संसर्गापासून प्रतिबंध होईल.
 
6 दुखापत - कोणत्याही प्रकाराची दुखापत झाली असल्यास आपण विक्स लावून हळुवार हाताने मॉलिश करा. या मुळे आपल्याला केवळ दुखण्यापासून आराम देणार नाही तर उब मिळाल्यामुळे त्या जागीच रक्त परिसंचरण देखील सुधारतं.
 
7 सनबर्न - उन्हात निघायचे आहे पण सनबर्न पासून वाचायचे देखील आहे, तर विक्सचा वापर करण्यासाठीचा हा एक उत्तम मार्ग आहे. फक्त ते त्वचेवर लावा आणि नंतर आरामशीर उन्हात बाहेर पडा. हे आपल्याला सनबर्न सह उष्णतेपासून वाचविण्यास मदत करेल आणि थंडावा मिळेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती