पावसाळ्यात का खाऊ नये मासोळी?

* मॉन्सूनमध्ये मासोळ्या आणि इतर समुद्री जीव अंडी देतात म्हणून यांचे सेवन केल्यास पोटात इन्फेक्शन आणि फूड पॉइजनिंग होऊ शकतं.
मॉन्सूनमध्ये सीव्हरेजच्या समस्येमुळे नदी तलावाचे पाणी दूषित होतं. म्हणून या दरम्यान मासोळ्यांऐवजी आपण चिकन किंवा मटन खाऊ शकतात.

* या मोसमात पॅक्ड किंवा स्टोअर केलेल्या मासोळ्या मिळतात. स्टोअर केलेल्या मासोळ्यांमधील पौष्टिकता नष्ट झालेली असते आणि लवकर खराबही होतात. या दिवसात फ्रेश मासोळ्या मिळण्याची शक्यता कमी असते.
 
* मॉन्सूनमुळे पाणी दूषित होतं आणि यामुळे मासोळ्याही. खराब मासोळ्या खाण्याने विषमज्वर, कावीळ आणि अतिसार सारखे रोग बलवत्तर होण्याची शक्यता वाढते.

 
* पावसाळ्यात स्टोअर केलेल्या मासोळ्या खराब होऊ नये म्हणून त्यांच्यावर सल्‍फेट्स आणि पोलीफोस्पाफेट सारखे प्रिझर्व्हेटिव्ह शिंपडले जातात. अश्या केमिकलयुक्त मासोळ्यांचे सेवन केल्याने श्वसन किंवा हृदयासंबंधी रोगांचा धोका वाढतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती