शेळीच्या दुधाचे फायदे जाणून घ्या

मंगळवार, 18 मे 2021 (09:30 IST)
गाय आणि म्हशीचे दूध आरोग्यासाठी चांगले मानले जाते. आरोग्यासाठी या दोन प्राण्यांचे दूध इतरांपेक्षा जास्त फायदेशीर आहे. परंतु शेळीच्या दुधात बरेच आरोग्याचे रहस्य लपलेले आहेत. याचा वापर केल्यामुळे  बर्‍याच रोगांपासून मुक्तता मिळू शकते. शेळीच्या दुधात असलेले पोषण घटक आपल्याला शारीरिक आणि मानसिक समस्यांपासून मुक्त करण्यात मदत करते. चला शेळीच्या दुधाचे फायदे तपशीलवार जाणून घेऊया -
 
1 अशक्तपणापासून बचाव करण्यासाठी उपयुक्त- जर शरीरात आयरनाची कमतरता असेल तर अशक्तपणाचा धोका वाढतो. अशक्तपणामुळे रक्त संपूर्ण शरीरात ऑक्सिजन वितरीत करण्यास अपयशी ठरत. म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शेळीच्या दुधाचे सेवन केले जाऊ शकते. जेणेकरून एखाद्याला अशक्तपणासारख्या जीवघेणा आजारापासून आराम मिळू शकेल.
 
2 केसांसाठी फायदेशीर - केसांच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी आवश्यक आहे. यामुळे केस गळणे थांबते. शेळीच्या दुधात दोन्ही जीवनसत्त्वे असतात. ते घेतल्याने केस गळती  कमी होऊ शकते.
 
3 मजबूत हाडे-शेळीच्या दुधात कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे हाडे मजबूत होतात. म्हणून शेळीच्या दुधाचे सेवन करणे फायद्याचे आहे.
 
4 हृदय रोगाचा त्रास - हृदयविकाराच्या बाबतीत कोलेस्ट्रॉल वाढू नये. याची खूप काळजी घेतली जाते. शेळीच्या दुधात मुबलक प्रमाणात फॅटी ऍसिड असतात. हे कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात. यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका टाळता येतो.
 
5 रोग प्रतिकारशक्ती बूस्टर -शेळीच्या दुधात सेलेनियम नावाचे  खनिजे अधिक प्रमाणात आढळतात. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. हे दूध एड्स ग्रस्त रूग्णांना दिले जाते कारण त्यांची प्रतिकारशक्ती खूपच कमकुवत होते.
 
6 प्लेटलेट्स वाढण्यास मदत करते - शेळीच्या दुधाचे सेवन चिकनगुनिया, डेंग्यू या आजारांमध्ये जास्त प्रमाणात  केले जाते. असे म्हणतात की शरीरात प्लेटलेट्स  कमी होऊ लागल्यास शेळीचे दूध द्यावे. जेणेकरुन रक्त घट्ट होणार नाही.अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
 
7 सूज कमी करण्यास उपयुक्त -शेळीच्या दुधात आढळणारे अँटी बेक्टेरिअल शरीरातील सूज कमी करण्यात मदत करते. याचे सेवन केल्याने शरीरातील जळजळ देखील कमी होऊ लागते.
 
8 वजन कमी करते- सध्या बहुतेक लोक आरोग्याबद्दल जागरूक होत आहे. वाढते वजन कमी करण्यासाठी फूड चार्टमध्ये बदल देखील करत आहेत. शेळीच्या दुधाचा देखील आहारात समावेश केला जात आहे. त्यात फॅटी ऍसिड असते. यामुळे लठ्ठपणा वाढत नाही.
 
9 त्वचेसाठी चांगले- शेळीच्या दुधातील पीएच पातळीचे प्रमाण त्वचेच्या पीएच पातळी इतके असतात. याचे सेवन  केल्यामुळे सुरकुत्या कमी होतात, तसेच चेहर्‍यावरील डाग  देखील कमी होतात.
 
10 शेळीचे दूध- जन्मल्या बाळासाठी आईचे दूध उत्तम मानले आहे परंतु आईला दूध येत नसल्यास बाळाला शेळीचे दुध दिले जाऊ शकते.हे सहज पचतं.परंतु बाळाला शेळीचे दूध देण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती