डोकेदुखी एक कारणे अनेक, 10 उपचार जाणून घ्या

शुक्रवार, 28 मे 2021 (17:52 IST)
डोके दुखीचे अनेक कारणे असू शकतात. सौम्य किंवा अधून मधून डोकेदुखी होणे ही सामान्य बाब असू शकते.जर आपल्याला वारंवार ही समस्या जाणवते ज्यामध्ये डोक्यात तीव्र वेदना उद्भवते.तर यासाठी चे उपाय जाणून घ्या.
 
1 सकाळी उठल्याबरोबर डोकेदुखी होणे ही मायग्रेनची लक्षणे आहे. यासाठी आपण लवकरच झोपायची सवय लावली पाहिजे. झोपेची अपूर्णता  हे मायग्रेनचे एक महत्त्वपूर्ण कारण आहे. जर आपल्याला ही समस्या येत असेल तर सकाळी उठल्यावर वाफ घेणे हे या वेदनेला टाळण्यासाठी उपयोगी ठरू शकते.
 
2 पुदिना देखील डोकेदुखी दूर करण्यासाठी उपयुक्त आहे.डोकेदुखी असल्यास पुदिना वाटून त्याचा रस काढून कपाळी लावा.काहीच वेळाने डोकेदुखी नाहीशी होईल.
 
3 आपणास हे जाणून आश्चर्य वाटेल की सफरचंद देखील डोकेदुखी बरे करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो.सफरचंदावर फक्त मीठ घालून   जेव्हा तीव्र डोकेदुखी असेल तेव्हा खा.
 
4 लिंबाचा एक उपाय देखील आहे ज्यामुळे आपले  डोकेदुखी कमी होऊ शकते.या साठी जास्त काहीच करू नका, फक्त लिंबू सोलून त्याचा वास घ्या.या मुळे आपले डोकेदुखी पळून जाईल. 
 
5 अक्युप्रेशरच्या मते,आपल्या हाताचा अंगठा आणि मध्यबोटाचा भाग दाबल्याने देखील डोके दुखीच्या वेदनेपासून आराम मिळतो.एकदा तरी हे करून बघा.
 
6 बऱ्याच लोकांना थंड हवेमुळे डोकेदुखी होते.जे सहज कमी होत नाही.असं झाल्यास दुधात जायफळ उगाळून आपल्या कपाळी हे लेप लावा.या मुळे देखील डोकेदुखी कमी होईल.
 
7 डोकेदुखी टाळण्यासाठी लवंगा आराम देतील. आपल्याला फक्त लवंगाची पूड करून कपड्यात बांधून एक लहान पोटोळी बनवायची  आहे. जेव्हा जेव्हा आपल्याला डोकेदुखीचा त्रास होईल  तेव्हा त्याचा वास घ्या. लवकरच आराम होईल.
 
8 सकाळी उठल्याबरोबर डोकेदुखीचा त्रास होत असेल तर, नीलगिरीच्या तेलाचे काही थेंब गरम पाण्यात टाकून त्याची वाफ घेतल्याने फायदा होईल. हा उपाय नियमितपणे  केल्याने सकाळच्या दुखण्यापासून कायमचा आराम मिळेल.
 
9 सकाळच्या डोकेदुखीच्या वेदनेला सहजपणे घेऊ नका.वेळीच या कडे लक्ष दिले गेले तर मायग्रेनच्या सुरुवातीस या त्रासापासून मुक्तता मिळू शकेल.
 
10 जर उपचारानंतर देखील वेदना कमी होत नाही तर अशा परिस्थितीत डॉक्टरांचा  सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती