जेवणानंतर पोटात गॅस तयार होणे ही एक सामान्य समस्या आहे, परंतु कधीकधी ही छोटीशी समस्या तुम्हाला खूप त्रास देते. पोट फुगणे, हलके पोटदुखी, अस्वस्थता आणि ढेकर येणे ही त्याची सामान्य लक्षणे आहेत. आजच्या जीवनशैलीमुळे हा त्रास वाढत आहे. या त्रासावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय अवलंबवू शकता.
मेथीदाणे आणि ओवा
मेथीदाणा आणि ओवा पचनासाठी चांगले मानले जाते. हे अपचन, पोटदुखी, गॅसवर फायदेशीर आहे. ओवा आणि मेथीदाणा एकत्र खाल्ल्याने त्याचे चांगले परिणाम मिळतात. मेथीदाणे आणि ओवा समप्रमाणात घेऊन त्यांना परतून घ्या आणि त्याची भुकटी बनवा. ही भुकटी जेवण झाल्यावर कोमट पाण्यासोबत थोड्या प्रमाणात घ्या.
हिंग
हिंगाची चव जरी कडू असली तरीही हिंग हा पोटात तयार होणाऱ्या गॅस काढून टाकण्यासाठी चांगला उपाय आहे. हिंगात पोटातील वायू कमी करण्यासाठी तात्काळ आराम देणारे अँटी-फ्लॅट्युलंट गुणधर्म आहेत.हिंग खाण्यासाठी, एका ग्लास कोमट पाण्यात चिमूटभर हिंग विरघळवा. जेवणानंतर हे पाणी प्या. लगेच आराम मिळेल.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.