Healthy Breakfast For Diabetics जगभरात मधुमेहाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. या आजाराचे मुख्य कारण म्हणजे बदलती जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयी. या आजारात किडनी, डोळे, यकृत, हृदय आणि इतर अनेक अवयव कमकुवत होतात. मधुमेहावर कोणताही इलाज नाही, पण आरोग्य तज्ज्ञांच्या मते आहार आणि जीवनशैलीत बदल करून रक्तातील साखरेची पातळी सामान्य केली जाऊ शकते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी सकाळचा नाश्ता सर्वात महत्त्वाचा असतो. जर तुम्हीही साखरेच्या वाढीमुळे हैराण असाल तर नाश्त्यात या गोष्टींचा अवश्य समावेश करा.
मसूर डाळीचे धिरडे
भारतीय नाश्त्यात धिरडे पसंत केले जातात. डायबिटीजचे रुग्ण असल्यास मसूर डाळीचे धिरडे फायद्याचे ठरेल. या डाळीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, जो साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. याशिवाय या डाळीमध्ये प्रथिने आणि फायबर मुबलक प्रमाणात असते. या मसूरच्या डाळीची पेस्ट करून द्रावण तयार करा, त्यात बारीक चिरलेली सिमला मिरची, टोमॅटो, कांदा आणि मीठ टाका, कमी तेलात हा चीला बनवा.