तुम्हाला भूक लागली की तुम्ही काहीही खायला तयार होत असाल तर स्वत:वर ताबा ठेवण्याची गरज आहे. अशानेच कॅलरीज वाढतात आणि मग शरीरावरील ताबा सुटतो. म्हणून गरज आहे काही टिप्सची:
* उगाचच काहीतरी तोंडात टाकण्याची सवय असेल तर अनेकदा शरीराला गरज नसल्यावरही आपण खातो. सर्वात आधी ही सवय तोडा.
* व्यायामात रस असू द्या. कंटाळा असेल तर रोज निरनिराळे व्यायाम करा. व्यायामादरम्यान आणि नंतर भरपूर पाणी प्या. पाण्यामुळे तुमचं पोट भरलेलं राहील.
* नाश्ता, लंच आणि डिनरच्या 15 ते 20 मिनिटांआधी ग्लासभर पाणी प्या. याने भूक कमी होईल.
* तेलकट, तुपकट खाण्याऐवजी, फळ, दूध, कडधान्य असे पदार्थ घ्या. याने पोटही भरेल आणि अशक्तपणा वाटणार नाही.
* शक्य असल्यास जेवण्याच्या अर्ध्यातासाआधी व्यायाम करा. याने हेव्ही नाश्ता टाळता येईल.