आजच्या काळात, लोकांना सर्वात जास्त काळजी असते की निरोगी कसे राहायचे, कारण आपल्या आजूबाजूला असे अनेक रोग आहेत जे आपल्याला लगेच विळख्यात घेतात. आजच्या धकाधकी आणि धावपळीच्या जीवनात बदलत्या जीवनशैली मुळे आणि खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे रोगाच्या कचाट्यात सापडतात. हा आजार सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. थॉयराइडला अनेक जण बळी पडतात. तरी पुरुषांपेक्षा स्त्रिया या आजाराला अधिक बळी पडतात. हा आजार मानेच्या थायरॉईड ग्रंथीच्या वाढीमुळे होतो. अशा परिस्थितीत दीर्घ उपचार आणि अनेक प्रकारची औषधे या काळात घ्यावी लागतात, जे घेणं आवश्यक आहे. या समस्येवर मात करण्यासाठी काही घरगुती उपाय करू शकता. चला तर मग जाणून घेऊ या.
थायरॉईड रोग म्हणजे काय?
त्याचे घरगुती उपाय जाणून घेण्यापूर्वी थायरॉईडबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे. यामध्ये थायरॉईड ग्रंथी T3 आणि T4 थायरॉक्सिन हार्मोन्स तयार करते आणि नंतर त्यांचा पचन, हृदय, शरीराचे तापमान आणि श्वासोच्छवासावर थेट परिणाम होतो. यासोबतच ते कोलेस्ट्रॉल आणि स्नायूंवर नियंत्रण ठेवतात. जेव्हा जेव्हा मानवी शरीरातील हार्मोन्स असंतुलित असतात तेव्हा वजन वाढण्याची किंवा कमी होण्याची समस्या उद्भवते, ज्याला थायरॉईड समस्या म्हणतात.
* निद्रानाश किंवा त्रास इ.
घरगुती उपाय -
1 आळशी किंवा जवस पावडर तुम्हाला खूप मदत करू शकते. तुम्हाला ही पावडर एक चमचा नियमित खावी लागेल, ज्यामुळे थायरॉईडमध्ये आराम मिळू शकतो.