Health Tips :Contact Lenses:लेन्स न काढता झोपणे धोकादायक ठरू शकते,जाणून घ्या

शुक्रवार, 3 जून 2022 (22:13 IST)
Contact Lenses Removing:कॉन्टॅक्ट लेन्स प्रत्येकजण वेगवेगळ्या कारणांसाठी वापरतात. यापैकी बहुतेक संख्या अशा लोकांची आहे ज्यांना दृष्टीची समस्या आहे आणि त्यांना चष्मा घालायचा नाही. त्याचबरोबर काही तरुण असेही आहेत जे डोळ्यांचा रंग बदलण्यासाठी किंवा डोळे अधिक आकर्षक दिसण्यासाठी कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करतात. तुम्ही या लेन्स कोणत्याही कारणास्तव वापरता,जर तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्स वापरत असाल तर तुम्ही झोपण्यापूर्वी लेन्स काढून टाका.लेन्स लावून झोपल्याने डोळ्यांना त्रास होऊ शकतो .झोपण्यापूर्वी काँटॅक्ट लेन्स काढायलाच हवे, जाणून घ्या का?
 
डॉक्टर रात्री झोपण्यापूर्वी लेन्स काढून टाकण्याचा आणि कॉन्टॅक्ट लेन्स सोल्युशनमध्ये टाकण्याचा सल्ला देतात. डॉक्टरांचा या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नये.कारण असे न केल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.रात्री झोपण्यापूर्वी कॉन्टॅक्ट लेन्स काढल्या नाहीत तर तुम्हाला कोणत्या समस्या होऊ शकतात चला जाणून घेऊ या.
 
1 कॉर्नियल सूज -
 एका संशोधनात सांगितले की, जे लोक रात्री लेन्स न काढता झोपतात, त्यांच्या डोळ्यांच्या कॉर्नियामध्ये सूज होण्याची समस्या उदभवते. हे घडते कारण कॉर्नियाला ऑक्सिजनची आवश्यकता असते. दिवसा जेव्हा तुम्ही लेन्स लावता तेव्हा कॉर्नियाला कमी ऑक्सिजन मिळतो आणि जेव्हा तुम्ही रात्री लेन्स न काढता झोपायला जाता तेव्हा कॉर्नियाला ऑक्सिजन मिळण्याचे प्रमाण आणखी कमी होते. त्यामुळे कॉर्निया सुजतो. ही सूज फारशी नसते आणि सहसा तुम्हाला कोणताही परिणाम दिसत नाही. परंतु या सूजमुळे पृष्ठभागावरील पेशींमध्ये अंतर निर्माण होते. यामुळे तुमच्या डोळ्यांमध्ये बॅक्टेरिया वाढण्यास जागा मिळते, ज्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो.
 
2 डोळ्याला संसर्ग होतो-
जेव्हा तुम्ही लेन्स न काढता झोपता तेव्हा तुमच्या डोळ्यांना संसर्ग होण्याची शक्यता 6 ते 8 पटीने वाढते. म्हणजेच, एक तर तुमच्या डोळ्यांमध्ये सूज  आल्यामुळे, रिक्त जागा तयार होते आणि नंतर डोळ्यांमध्ये बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता वाढल्याने संसर्गाचा धोका आणखी वाढतो.
 
लेन्स लावून झोपल्याने काय होते?
रात्री लेन्स न घालण्याची दोन मोठी कारणे सांगितली गेली आहेत, या व्यतिरिक्त, लेन्स घातल्याने झोपल्यामुळे डोळ्यांना आणखी कोणकोणत्या समस्या येतात, जाणून घ्या...
 
* तुमचे डोळे प्रकाशासाठी अधिक संवेदनशील होतात. म्हणजेच, थोड्याशा जास्त प्रकाशात, तुम्हाला तुमचे डोळे उघडण्यास त्रास होऊ शकतो.
* डोळे दुखणे, कोरडेपणा जाणवणे आणि डोळ्यांना खाज येणे ही समस्या असू शकते.
* डोळे लाल होतात
* कमकुवत दृष्टी वाढू शकते म्हणजेच दृष्टी कमकुवत होऊ शकते.
* डोळ्यात पाणी येण्याची समस्या असू शकते.
* डोळ्यांची जळजळ ही नेहमीच डोळ्यांची समस्या असू शकते.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती