Health Tips : आयुर्वेदाच्या 11 नियमांनी आरोग्य राहील तंदुरुस्त

शुक्रवार, 10 मे 2024 (06:34 IST)
आयुर्वेद ही भारतातील प्राचीन पद्धती आहे. आयुर्वेद प्राचीन काळापासून संतुलित जीवन जगण्याचे पालन करण्यासाठी सांगते. हे नियम साधे आणि सोप्पे आहे. तुम्ही यांना तुमच्या दैनंदिन जीवनात आत्मसात केले तर तुम्ही शारीरिक आणि मानसिकरित्या आरोग्यदायी बनाल. चला जाणून घेऊ या आयर्वेदाच्या 11 नियमांबद्दल  
 
1. दिनचर्या आणि वातावरणानुसार जेवण करावे 
आयुर्वेद अनुसार प्रत्येक वातावरणात वेगेवेगळे जेवण करावे. उन्हाळ्यात थंड व हलके, हिवाळ्यात गरम आणि पौष्टिक जेवण करावे. दिनचर्येनुसार जेवण करण्याची वेळ निश्चित असावी. प्रयत्न करा की नियमित वेळेतच जेवण करावे. 
 
2. योग्य झोप घ्यावी 
शरीराला आराम मिळण्यासाठी योग्य झोप महत्वाची असते. कमीतकमी 7-8 तास झोप घ्यावी. झोपण्यापूर्वी कोमट दूध प्यावे व संगीत ऐकावे. 
 
3. नियमित व्यायाम करावा 
व्यायाम शरीराला आरोग्यदायी बनवून आजारांपासून दूर ठेवतो. प्रत्येक दिवशी कमीतकमी 30 मिनिट व्यायाम नक्की करावा. 
 
4. ध्यान करावे 
ध्यान मनाला शांत करते व तणावमुक्त करते. प्रत्येक दिवशी ध्यान करून आपल्या भावना आणि विचारांना नियंत्रित करायला शिकावे. 
 
5. योगअभ्यास करावा 
योग्य केल्याने शरीर आणि मन आरोग्यदायी राहते. ही एक प्राचीन पद्धत आहे. योगाचे वेगवेगळे आसन शरीराच्या प्रत्येक अवयवाला आरोग्यदायी ठेवते. 
 
6. हाइड्रेटेड राहावे 
पाणी शरीरासाठी गरजेचे आहे. प्रत्येक दिवशी कमीतकमी 8-10 ग्लास पाणी नक्की प्यावे. 
 
7. सकारात्मक राहा 
तुमचे विचार तुमचे आरोग्य घडवत असतात. नेहमी सकारात्मक विचार करावे. 
 
8. दुसऱ्यांची मदत करावी 
दुसऱ्यांना मदत केल्यास मनाला आनंद मिळतो. तसेच तणाव कमी होतो. आपल्या जवळच्या व्यक्तींसाठी नेहमी वेळ काढावा. 
 
9. निसर्गाजवळ राहावे 
निसर्गाजवळ राहिल्यास तुम्हाला नैसर्गिक शांती मिळेल. निसर्गरम्य ठिकाणी फिरावे. 
 
10. आवडीचे काम करावे 
काम  करतांना आनंद मिळणे गरजेचे असते. जर तुम्ही कामात आनंदी नसाल तर दुसरे काम करा. ज्यामधून तुम्हाला आनंद येईल. 
 
11. स्वतःवर प्रेम करा 
स्वतःवर प्रेम करणे गरजेचे आहे. स्वतःला स्वीकार करावे. तसेच आपल्या कमी भरून काढण्याचा प्रयत्न करावा. 
आयुर्वेदाच्या या 11 नियमांचे पालन केल्यास तुम्ही शारीरिक आणि मानसिकरित्या आरोग्यदायी राहाल. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती