जेवणाची सुरुवात तिखट पदार्थांपासून आणि शेवट गोड पदार्थाने करावा

शुक्रवार, 1 मे 2020 (07:11 IST)
प्रत्येकाची सवय असते की जेवण झाले की काही गोड धोड खाण्याची. हे फार आधीच्या काळापासून चालत आले आहे. हिंदू शास्त्रात आणि आयुर्वेदात देखील हे आढळून येते. गोड खाण्याविषयी सर्वांनाच त्याचे गुण ठाऊक आहे पण जेवणाच्या आधी तिखट पदार्थ का खातात हे देखील जाणून घेणे महत्त्वाचे आहे. 
 
तिखट पदार्थ खाण्याचे फायदे
1 जेवण्यात तिखट पदार्थ आधी खाल्ल्यामुळे आपले पचन तंत्र क्रियाशील होतात.
 
2 संशोधकांनी सांगितल्यानुसार ज्या वेळी आपण तिखट पदार्थ खातो त्यावेळी आपल्या शरीरातून पाचक रस आणि आम्ल तयार होतात जे आपल्या अन्नाचे व्यवस्थितरीत्या पचन करण्यास मदत करतात. यावरून समजते की आपली पचनशक्ती कशी आहे. 
 
3 आयुर्वेदामध्ये सांगितले आहे की जेवणाच्या सुरुवातीला तिखट अन्न खाल्ल्याने पोटामधील पचन तत्त्व आणि आम्ल क्रियाशील होतात, जेणे करून पचन तंत्र सुरळीत काम करतो.
 
4 जेवणाच्या सुरुवातीस आपण तिखट पदार्थ खाल्ल्याने जठर प्रसरण पावतो आणि भूक वाढते.
 
आता जाणून घ्या गोड पदार्थांचे सेवन केल्याचे फायदे
1 गोड पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेट आढळतं. कार्बोहायड्रेट आपल्या पचनाची प्रक्रियेस मंदावते. ह्या साठी जेवण्याचा नंतर गोड खाल्ल्याने पचनाची प्रक्रिया सुरळीत चालते.
 
2 गोड खाल्ल्याने सेरोटॉनिन हार्मोन्सची पातळी वाढते. हे एक न्यूरोट्रान्समीटरचे काम करते. ज्यामुळे आपल्याला गोड खाल्ल्यावर आपल्याला आनंद मिळते. खरं तर गोड खाल्ल्याने एमिनो ऍसिड ट्रिप्टोफेन शोषणाची क्रिया वाढवते. ट्रिप्टोफेन ला सेरोटॉनिनची पातळी वाढविण्यासाठी ओळखले जाते. सेरोटॉनिन एक न्यूरो ट्रान्समीटर म्हणून काम करत असते. ह्याचे कार्य आपल्याला आनंद मिळवून देणे आहे. म्हणून तर गोड खाऊन आपल्याला आनंद होतो.
 
3 कधी कधी आपण काहीवेळा जास्त जेवून घेतो अश्या स्थितीमध्ये आपल्याला हायपोग्लायसिमीयाच्या स्थिती मधून जावे लागते. या परिस्थितीत रक्त दाब (ब्लड प्रेशर) कमी होते. अश्या वेळेस जेवण्यानंतर गोड खाण्यास सांगितले जाते.
 
4 आयुर्वेदामध्ये सांगितले आहे की जेवणानंतर गोड खाल्ल्याने आम्ल तयार होत नाही त्यामुळे पोटात जळजळ होत नाही. 
 
चेतावणी : गोड मध्ये आपल्याला साखरेचे सेवन करणे टाळले पाहिजेत. साखर आरोग्यास दुष्प्रभावी असते. साखर किंवा त्यापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करणे टाळले पाहिजे नाही तर जाडी वाढल्या बरोबरच अजून आजारांना सामोरी जावे लागेल. आपल्याला ऑरगॅनिक गूळ खाण्यात वापरले पाहिजे. किंवा या पासून बनवलेल्या वस्तूंचा वापर करावा. नारळाची साखर किंवा ब्राऊन साखर सुद्धा वापरण्यात घेऊ शकतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती