रुचकर चविष्ट रवा जिलेबी, पटकन होईल तयार

शुक्रवार, 10 एप्रिल 2020 (18:54 IST)
साहित्य- 1 मोठी वाटी बारीक रवा, 1/2 वाटी दही, चिमूटभर खायचा गोड रंग, 1 चमचा बँकिंग पावडर, तळण्यासाठी तूप. 2 वाटी साखर(पाक करण्यासाठी), वेलचीपूड.
 
कृती- एका भांड्यात रवा घ्यावा त्यामध्ये दही टाकून त्याला मिसळावे. त्यात चिमूटभर खाण्याचा गोड रंग घालावा. गरज असल्यास त्यात पाणी घालावे आणि हे मिश्रण तासभर झाकून ठेवावे. हे सारण जास्त पातळ नको. 
पाक करण्यासाठी एका भांड्यात साखर घालून त्यात पाणी घालून गॅस वर माध्यम आचेवर ठेवावे. त्यात वेलचीची पूड घालावी. साखरेचा एक तारी पाक तयार करावा. तळण्यासाठी एका पसरट पॅन किंव्हा कढईमधे तूप घालावे. मिश्रणाला एका प्लॅस्टिकच्या पिशवी किंवा चौरस कापड्यामध्ये टाकावे. आणि त्या पिशवी किंवा कापड्याला खालून छिद्र करावे आणि मिश्रण तुपात सोडावे माध्यम आचेवर तळून घ्यावे नंतर पाकात सोडावे. पाकात मुरल्यावर काढून घ्यावे. रुचकर आणि चविष्ट रवा जिलेबी खाण्यासाठी तयार.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती