काय सांगता, कसुरी मेथी खाल्ल्यानं आरोग्यास फायदा होतो

शनिवार, 23 जानेवारी 2021 (19:37 IST)
हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या मुबलक प्रमाणात मिळतात. ह्या मध्ये मेथी सहजपणे मिळते. मेथीची भाजी, पराठे बनवून खातो आरोग्यासाठी फायदेशीर  हिरवी मेथी  ताजी आणि सुकवून देखील खाऊ शकतो. तसेच मेथी दाणा देखील फोडणी देण्यासाठी मसाल्याच्या रूपात वापरतात. मेथी मध्ये अँटि ऑक्सिडंट, प्रथिन, आयरन, कॅल्शियम समृद्ध स्रोत असतात. या मुळे अन्नाचे पचन सहजपणे होतं. हे हाडांना देखील बळकट करत. एकंदरीत मेथी खाणं सर्व प्रकारे आरोग्यास फायदेशीर आहे.मेथी वाळवून ठेवतात त्याला कसुरी मेथी म्हणतात जी आरोग्यासाठी फायदेशीर आहे जर आपल्याला हे माहीत नाही की कोणत्या डिश मध्ये वापरतात तर आम्ही सांगत आहोत की ह्याचा वापर कसा करावा. 
 
* कसुरी मेथी आपण पनीरची भाजी किंवा कोंबडीच्या भाजीमध्ये सर्वात शेवटी वरून घालू शकता. हीअन्नाची चव वाढविण्यासह ह्याचा वास अन्नाला चविष्ट बनवतो, ज्यामुळे कोंबडीची भाजी किंवा पनीरच्या भाजीची चव देखील वाढते . 
 
* दररोजच्या वरणात देखील कसुरी मेथी घालू शकता. या साठी एका पॅन मध्ये साजूक तुपात जिरे,हिंगाच्या फोडणीसह कसुरी मेथी देखील घालावयाची आहे. आपली इच्छा असल्यास वरून कोथिंबीर प्रमाणे वरून घालू शकता. 
 
* आपणास कसुरी मेथी चा तीक्ष्ण सुगंध आवडत असल्यास .कोणत्याही डिश मध्ये  गार्निशिंग करून वरून घालू शकता. 
 
* हिवाळ्यात हिरव्या मेथीला चिरून कणकेत मळून पराठे बनविता येतात. तसेच मेथी बटाट्यासह मिसळून कोरडी भाजी बनवू शकतो शिवाय मेथी मटार मलई खूप प्रसिद्ध मेथी ची भाजी  ग्रेव्हीची आणि मसालेदार बनते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती