व्हिटॅमिन सी-यु्रत फळेः शरिरात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपण अँटी ऑक्सिडेंटयुक्त फळ आणि भाज्यांचे सेवन करायला हवे. यासाठी संत्री, चेरी, लिची, लिंबू याचा आहारात नियमित समावेश करायला हवा. व्हिटॅमिन सी हे शरीरात रक्ताच्या पेशी वाढवण्यासाठी मदत करते.
दहीः रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी दहीदेखील उपयुक्त पदार्थ आहे. जेवणाबरोबर दररोज दही खाल्ल्यास अनेक आजारांपासून आपल्याला मुक्ती मिळते. दहीपासून तयार केलेले ताकही आरोग्यवर्धक आहे. याशिवाय दह्याची कोशिंबिर, दहीभातदेखील आरोग्याला लाभदायी आहे.
चहा : थंडीच्या दिवसांत चहा हे सर्वात आवडीने घेतले जाणारे पेय आहे. चहामुळे थकवा, क्षीण दूर होतो. तसेच घशातील खवखवदेखील थांबते. चहामुळे सर्दी, पडसे कमी होते. लहान-मोठ्या आजारांना दूर ठेवण्यासाठी चहा उपयु्रत ठरतो. आजकाल चहाचे बरेच प्रकार बाजारात उपलब्ध असून आवडीनुसार चहाची निवड करु शकतो.