चेहर्यावर मॉइश्चराइझर लावा. आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार मॉइश्चराइझरची निवडा. त्वचा तेलकट असल्यास जेल मॉइश्चराइझर, सामान्य किंवा संमिश्र त्वचेसाठी लोशन आणि कोरड्या त्वचेसाठी क्रीमचा उपयोग योग्य ठरेल.
मेकअप करणं आवश्यक असल्यास नॉन-कॉमेडोजेनिक प्रोडक्ट वापरा.
मास्कमुळे त्वचेवर घर्षण होत असल्यास स्किन गार्ड झिंक ऑक्साइडचा वापर करा. हे नाकावर किंवा कानामागे लावू शकता.
त्वचेवरील मुरुम कमी करण्यासाठी अँटी-बायोटिक मलम लावा.
सतत मास्क लावावा लागत असल्या दर दोन तासांमध्ये ५ मिनिटांसाठी मास्क ब्रेक घ्या. मास्क काढताना आपण सार्वजनिक ठिकाणी नाही हे सुनिश्चित करा.
अधिक घट्ट किंवा अधिक सैल मास्क वापरू नका.
सिंथेटिक, नायलॅान किंवा पॉलिस्टर फॅब्रिकपासून तयार करण्यात आलेले मास्क न वापरता कापडाचे आरामदायक मास्क वापरावे.