Pegan Diet ने लठ्ठपणा पळवा, पेगन डायटचे नियम जाणून घ्या

बुधवार, 20 जानेवारी 2021 (13:10 IST)
हल्ली नवीन डायट प्लान ट्रेंडमध्ये आहे ज्याचे नाव आहे- पेगन डायट प्लान. हे प्लान वजन कमी करण्यात मदत करेल आणि लठ्ठपणाशी निगडित आजार नाहीसे करेल. पेगन डायट हे पॅलियो आणि व्हेगन आहारपद्धतींचे कॉम्बिनेशन आहे. या आहारात काही विशेष खाद्य पदार्थांचा समावेश केला जातो. आपण ही डायट फॉलो करु इच्छित असाल तर त्याचे नियम, फायदे आणि नुकसान जाणून घेणे आवश्यक आहे- 
 
पेगन डायट हे पॅलियो आणि व्हेगन आहारपद्धतींवर आधारित आहे. पॅलियो डायटमध्ये जास्त भर प्रथिनांवर दिलं जातं ज्यात मांस, फळं, माज्या आणि मासोळ्या सारख्या पदार्थांचे सेवन केलं जातं. या आहारात धान्य, फळ्या, साखर, मीठ आणि चहा-कॉफी सारखे पदार्थ वर्ज्य आहे. तर व्हेगन डायट मध्ये मांसाहार आणि दुध व दुग्धजन्य पदार्थ, तसेच प्राण्यांपासून मिळालेले सर्व पदार्थ वर्ज्य आहेत. 
 
दोन्ही डायट एकमेकांच्या विपरित आहे तरी पेगन डायटमध्ये संतुलित प्रमाणात पोषक तत्त्व मिळावे यावर भर देण्यात येतं. म्हणून यात ताज्या भाज्या आणि फळांचा समावेश मोठ्या प्रमाणावर आहे. पेगन डायटमध्ये व्यक्तीच्या एकूण आहाराच्या 75 टक्के भाग फळं आणि भाज्या असा असावा.
 
काय खावे
या आहारात बटाटे, कॉर्न सारख्या स्टार्चचे प्रमाण अधिक असणारे पदार्थ टाळावे आणि नॉन स्टार्च आहार घ्यावा. तसेच आहारामध्ये कडधान्ये, डाळी, सुकामेवा, इत्यादी पदार्थांचा समावेश करायचा आहे. मांसाहारी व्यक्ती अंडी, मासे, चिकन इत्यादी पदार्थांचा समावेश करु शकतात. पण त्याचे प्रमाण 25 टक्क्यांहून अधिक नसावे. तरी हेल्दी फॅट्स आहारात सामील करता येईल ज्यात ओमेगा-3 स्त्रोताचे समावेश आहे. तरी शक्यतो आर्गेंनिक फूड वापरण्याचा सल्ला दिला जातो.
 
काय टाळावे
या आहारात डेअरी प्रॉडक्ट्स जसे दूध, दही, लोणी आणि पनीर केवळ एकदा घेणे योग्य ठरेल. परंत वीटबेस प्रॉडक्ट्स टाळावे. ग्लूटने फ्री ग्रेन, ब्राऊन राईस घेता येतील तरी कमी प्रमाणात. पेगन डायटमध्ये कृत्रिम रंग, स्वाद आणि गोड पदार्थ हे विसरावं लागेल.
 
फायदे 
यात प्रोसेस्ड किंवा तेलकट, गोड पदार्थ वर्ज्य असल्याने वजन नियंत्रण होतं. मधुमेहाची तक्रार दूर होते. रक्त पातळीवर नियंत्रण राहतं, शरीराची चयापचय शक्ती सुधारते. 
 
तोटे
यात मांसाहार शक्यतो वर्ज्य असल्यामुळे मांसाहारी लोकांसाठी हे अवघड होऊ शकतं. तसेच भाज्यांचे सेवन अतिशय मर्यादित प्रमाणात करायचे असल्याने पोषक तत्तवांची कमी भासू शकते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती