आरोग्यासाठी रोज तीन केळी खा आणि त्याचे फायदे बघा!

असे म्हणतात की केळी खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो. मात्र केळी खाल्ल्याने वजन वाढत नाही तर आरोग्यास अनेक फायदे होतात. संशोधनातून हे समोर आले आहे की, दररोज तीन लहान केळी खाल्ल्याने जितकी एनर्जी मिळते तितकी 90 मिनिटे वर्कआउट केल्याने मिळते. मात्र केळ्यांनी केवळ एनर्जीच मिळत नाही तर तुम्ही फिट आणि हेल्दी राहता.
केळी खाण्याचे आरोग्यदायी फायदे….
* केळी खाण्याने ब्लडप्रेशर कंट्रोलमध्ये राहतो.
* महिलांसाठी केळी खाणे गरजेचे त्यामुळे हाडे मजबूत होतात.
* रिसर्चनुसार, केळी खाल्ल्याने डिप्रेशन दूर होते. केळ्यांमधील प्रोटीनमुळे केवळ मूड चांगला होतो.
* केळ्यातील व्हिटामिन बीमुळे रक्तातील ग्लुकोजवर नियंत्रण राहते.
* केळ्यात आर्यन असते ज्यामुळे ऍनिमियाचा धोका टळतो.
* सकाळचा थकवा दूर करण्यासाठी केळी खाणे फायदेशीर ठरते.

वेबदुनिया वर वाचा