कडक उन्हामधून घरी आल्यावर करू नका ह्या पाच चुका, येऊ शकतात आरोग्याच्या समस्या

बुधवार, 1 मे 2024 (15:42 IST)
उन्हाळ्यामध्ये उष्णतेची तीव्रता खूप असते. उन्हामधून घरी आल्यावर आपण अश्या काही चुका करतो ज्या आपल्या आरोग्याला नुकसान करतात. चला जाणून घेऊ या उन्हातून घरी आल्यावर कोणत्या चुका करू नये. 
 
थंड पाणी पिणे-
उन्हातून घरी आल्यावर लागलीच थंड पाणी पिऊ नये. हे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे शरीराचे तापमान अचानक कमी होऊ शकते. ज्यामुळे सर्दी-पडसे, गळ्यात खवखव यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. याकरिता उन्हामधून घरी आल्यावर थोडावेळ आराम करावा मग पाणी प्यावे. 
 
अंघोळ करणे- 
उन्हामधून घरी आल्यावर लागलीच अंघोळ करू नये. यामुळे शरीराचे तापमान अचानक बदलू शकते. म्हणून उन्हातून घरी आल्यावर लागलीच अंघोळ करू नये. 
 
एसी मध्ये बसणे- 
उन्हामधून घरी आल्यावर लागलीच एसी मध्ये बसणे टाळावे. यामुळे शरीराला खूप नुकसान होऊ शकते. ताप येऊ शकतो तसेच, सर्दी-पडसे होऊ शकते. 
 
जेवण करणे- 
उन्हाळ्यामध्ये घरी आल्यानंतर लागलीच जेवण करू नये. यामुळे शारीरिक त्रास होऊ शकतो. उन्हातून घरी आल्यानंतर जेवण केल्यास शरीराला त्रास होतो. जेवण पचायला समस्या येऊ शकते. 
 
लागलीच झोपणे- 
उन्हामधून घरी परतल्यानंतर लागलीच झोपू नये. कमीतकमी एक तासानंतर झोपावे. 
 
*उन्हातून घरी परतल्यानंतर काय करावे 
हलके कोमट पाणी प्यावे. तसेच 15-20 मिनिटांनी अंघोळ करावी. 30 मिनिटांनी एसी मध्ये बसावे. तसेच 30 मिनिटांनी जेवण करावे मग 1 तासांनी झोपावे. 
 
ही सावधानी बाळगून उन्हामधून घरी परतल्यानंतर तुम्ही आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकतात. शरीराचे तापमान सामान्य होण्यासाठी वेळ द्यावा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती