सर्दी पडसं झाले असल्यास या गोष्टींचे सेवन करू नका

शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021 (08:30 IST)
बरेच लोक सर्दी झाल्यावर औषधे घेतात, परंतु या काळात काय खावे आणि काय नाही ही काळजी घेणे विसरतात  अशा प्रकारच्या वस्तूंचे सेवन करतात ज्यामुळे त्यांना हानी तर होते पण सर्दी पडसं जास्त वाढते. कफाचा त्रास होऊ लागतो म्हणून सर्दी पडसं असल्यास काय घ्यावे आणि काय नाही हे जाणून घेऊ या. 
 
 * दुधाचे पदार्थ - 
दूध, दही लोणी सारखे पदार्थ थंड प्रकृती चे असतात जे कफ प्रकृती ला वाढवतात सर्दी पडसं असल्यावर या पदार्थांचे सेवन करू नये. औषधे घेण्यासाठी दुधाचा वापर करता आहात तर दुधाचे प्रमाण कमी करा.
 
* चमचमीत जेवण- 
सर्दी पडसं असल्यावर मसालेदार अन्न घेणे टाळा तिखट, काळीमिरी, घेणे टाळा. या मुळे समस्या वाढू शकते साधें आणि हलके आहार घ्या. मसालेदार अन्न घशाला नुकसान करते. 
 
* चहा कॉफी-
सर्दी पडसे असल्यावर लोक चहा कॉफीचे प्रमाण जास्त घेतात. या मध्ये कॅफिन असते जे लघवीचे प्रमाण वाढवते. या मुळे वारंवार लघवी होण्याची समस्या उद्भवू शकते. आणि पाण्याची कमतरता देखील होऊ शकते. या मुळे पोटाचे आजार वाढतात. 
 
* साखर -
सर्दी झाल्यावर साखरेचे प्रमाण कमी करावे. हे रोग प्रतिकारक शक्तीला कमकुवत करते. म्हणून साखरेचे प्रमाण कमी करणें चांगला पर्याय आहे. खोकला वाढू शकतो.
 
* सूप- 
सर्दी झाल्यावर काही गरम प्यावं असं वाटते क्रिमी सूप हे कफ घट्ट करतो या मुळे सर्दी आणि ताप येऊ शकतो म्हणून या वेळी सूप घेऊ नये. इच्छा असल्यास बिना क्रीमचे घरात बनलेले सूप घ्या  . 
 
* बेक्ड फूड- 
ही एक प्रकारची चरबी आहे जी हळू-हळू पचते. या मुळे घसा खवखवतो आणि शरीरात चरबी देखील वाढते. जास्त बेक्ड केलेले अन्नाचे सेवन केल्याने आवाज बसू शकतो आणि घशात वेदना देखील होऊ शकते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती