रोज दही खाऊन कंटाळला असाल ताक प्या, खूपच फायदेशीर ठरेल

दही किंवा ताक जेवण्यात सामील करावं असे आपण ऐकलं असेल. परंतू यांच्या फायद्याची गोष्ट बघायला गेलो तर ताक अधिक फायदेशीर ठरतं. दह्याने ताक तयार होत असल्यावर ताक अधिक फायदेशीर कसं अशा प्रश्न मनात येणे साहजिक आहे... तर जाणून घ्या ताकाचे फायदे....
 
ताक पचण्यात सोपं असतं. याने लिक्विड डायट देखील पोटाला मिळते.
 
ताकात व्हिटॅमिन B 12, कॅल्शियम, पोटॅशियम आणि फास्फोरस सारखे तत्त्व असतात. हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
 
एक शोधाप्रमाणे ताक कोलेस्टरॉल नियंत्रित करण्यात मदत करतं. यात बायोअॅक्टिव्ह प्रोटीन असतं ज्याने कोलेस्टरॉलवर नियंत्रण राहतं. ताक हाय ब्लड प्रेशरला देखील नियंत्रित करतं.
 
ताक फायदेशीर असलं तरी अनेकदा दह्याचे सेवन योग्य ठरतं. कारण दह्यामध्ये पोषक तत्त्व अधिक प्रमाणात असतात. वजन वाढू इच्छित लोकं ज्यांच्यात पोषणाची कमी आहे त्यांनी दही खावं. काही आजारांमध्ये पेय पदार्थ घेण्यास मनाही असते अशात दह्याचे सेवन योग्य ठरतं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती