फळं किवा सलॅड खाणे चांगली सवय असली तरी अनेकदा लोकांना हे पदार्थ खाल्ल्यानंतर पोट फुलणे, जड वाटणे अशी समस्या उद्भवते. यामागील मोठं कारण आहे कच्चे फळं किवा सलॅड खाल्ल्यानंतर पाणी पिण्याची सवय. आयुर्वेदानुसार देखील कच्च्या भाज्या आणि फळं सेवन केल्यानंतर पाणी पिणे योग्य नाही. यानंतर पाणी पिण्यानंतर ब्लोटिंगची समस्या येते.
म्हणून पिऊ नाही पाणी
फळांमध्ये उच्च प्रमाणात शुक्रोज, फ्रूक्टोज आणि यीस्ट असतं. फळं खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने पाणी आणि अॅसिडचा घोळ पोटात यीस्टसाठी विस्तार होण्यास मदत मिळते. परिणामस्वरूप पोटात गॅस निर्माण होते आणि पोट फुगू लागतं.