सकाळी उठल्यावर सर्वात आधी बघत असाल मोबाईल, तर घातक असू शकतात परिणाम

सकाळी डोळे उडल्यावर सर्वात आधी मोबाईल हातात घेणार्‍या लोकांची संख्या वाढत चालली आहे. परंतू या सवयीमुळे दिवसभर तणाव जाणवतो हे देखील लक्षात येत आहे, अलीकडे झालेल्या एका शोधात असे स्पष्ट झाले आहे. 
 
सकाळी उठल्या उठल्या जे लोक हातात मोबाईल घेतात त्यांना दिवसभर सुरळीत काम करणे कठिण जातं. 
 
तज्ज्ञांप्रमाणे सकाळी उठल्यावर जेव्हा आम्ही मोबाइलमध्ये नोटिफिकेशन बघतो, आमचा मेंदू त्या विषयावर विचार करू लागतो. ज्यामुळे मन इतर कामात लागत नाही. असे केल्याने आमच्या कार्यक्षमतेवर देखील प्रभाव पडतो.
 
सकाळी उठल्यावर जेव्हा आम्हाला एखाद्या गोष्टी कळतं मग ती स्वत:शी निगडित असो वा नसो, आणि सतत त्याबद्दल विचार करू लागतो तेव्हा आम्हाला तणाव आणि ऐंग्जाइटी होऊ लागते. सकाळी अनेक लोकांचं ब्लड प्रेशर वाढलेलं असतं असे देखील म्हटले गेले आहे. अशात अधिक ताणामुळे त्यात भर पडते. यामुळे गंभीर आजारांना सामोरं जावं लागू शकतं.
 
सकाळी उठल्यावर जेव्हा आम्ही ईमेल किंवा नोटिफिकेशन तपासत असतो तेव्हा आम्ही मागील दिवसांच्या गोष्टी वाचत असतो. ज्यामुळे वर्तमान विसरून भूतकाळात जगू लागतो. यामुळे आपलं मन आणि मेंदू वर्तमान स्थितीत मन लावण्यात अक्षम ठरतात ज्यामुळे दिवसाची सुरुवातच योग्य रित्या होऊ पात नाही.
 
तज्ज्ञांप्रमाणे सकाळी उठल्यावर फोन वापरणे टाळावे. आपण सकाळी उठल्यावर मेडिटेशन किंवा योगा देखील करू शकतात. याने मन आणि मेंदूला शांतात लाभेल. ज्यामुळे आपण कार्य चांगल्या रित्या पार पाडू शकाल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती