अनेकांची व्यायामाची संकल्पना फक्त जीमपुरती किंवा ट्रेडमीलवर चालण्यापुरती मर्यादित असते. पण तंदुरुस्त राहाण्यासाठी जीम किंवा फिटनेस क्लासला जाण्याची आवश्यकता असतेच असे नाही. तुमच्याकडे दोरीच्या उड्या आणि व्यायामाची इच्छा या दोन्ही गोष्टी असतील तर तुम्ही नक्कीच व्यायाम करता फिट राहू शकता. दररोज दोरीच्या उड्या मारण्याचे बरेच लाभ आहेत.
* दोरीच्या उड्यांमुळे डोळे, हात आणि पाय यांच्यातलं सहकार्य वाढतं. पाय आणि दोरीच्या हालचालीकडे तुमचं लक्ष नसलं तरी मेंदू या सगळ्या हालचालींची नोंद ठेवत असतो. दोरीच्या उड्या मारताना विविध प्रकारच्या हालचाली केल्यामुळे अवयवाचं सहकार्य अजूनच वाढतं.