मुलांना प्लास्टिकच्या भांड्यात खाऊ घालत असाल तर नक्की वाचा

सोमवार, 13 सप्टेंबर 2021 (09:33 IST)
सध्याच्या काळात बाजारपेठेत लोकांना आकर्षित करणाऱ्या आणि भुरळ पाडणाऱ्या बऱ्याच गोष्टी आल्या आहेत. कोणतीही ही नवीन आणि चांगली दिसणारी गोष्ट लहान मुलांना लगेच घ्यावीशी वाटते. मग ती वस्तू किंवा गोष्ट कोणतीही असो.
 
आज सर्वत्र प्लास्टिकचा सर्रास वापर होत आहे. शाळेत मुलांना दिले जाणारे खाण्याचे डबे असो किंवा पाण्याच्या सुंदर आकर्षक बाटल्या असो किंवा कंपास बॉक्स असो. मुलांना भुरळ पाडणारे असतात. पण आपल्याला माहीत आहे का की या मुलांना आपण जे प्लास्टिक वापरण्यासाठी देता ते किती तरी पटीने त्यांच्या आरोग्यास हानिकारक आहे.
 
प्लास्टिक हे पर्यावरणासाठी तर हानिकारक आहेच परंतु हे सगळ्याच प्राण्यांसाठी देखील हानिकारक आहे. प्लॅस्टिकच्या भांड्यातून जेवल्याने अनेक आजार होण्याची शक्यता नाकारतं येत नाही.
 
आपण आपल्या आणि आपल्या कुटुंबीयांच्या आरोग्यासाठी सर्व काही करीत असतो. मुलांच्या उत्तम आहारासाठी पोषक घटक मिळावे या साठी आहार योजना अशी करतो जेणेकरून त्यांची सर्वांगीण वाढ होवो. त्यांचे सर्व हठ्ठ पुरवतो. अश्या वेळी आपण आपल्या मुलांना रंग बेरंगी प्लास्टिकच्या भांड्यातून जेवण देत असतो. ही प्लॅस्टिकची भांडी आपल्या मुलांच्या आरोग्यास हानिकारक असतात.
 
प्लास्टिक हे नॉन बायोडिग्रेडेबल आहे. प्लॅस्टिकची भांडी बीपीए पासून मुक्त जरी असले तरी ती आपल्या मुलांसाठीच नव्हे तर निसर्गासाठी देखील हानिकारक असतात. कारखान्यात प्लास्टिक तयार करण्याचा वेळी बेंझिन नावाचे मिश्रण हवेत सोडतात. जे घातक असून कॅन्सर सारख्या आजाराला आमंत्रण देतं. प्लास्टिक निर्मिती करणाऱ्या कारखान्याच्या जवळ राहणाऱ्या लोकांना लिम्फोमा आजाराचा धोका होऊ शकतो.
 
प्लॅस्टिकची भांडी उष्णतेमुळे आणि दररोज घासल्यामुळे त्यावरील थर नष्ट होतो. अनेकदा प्लॅस्टिकची भांडी तयार करताना हानिकारक रसायनाचा वापर केला जातो. आणि त्या भांड्यात खाल्ल्याने कॅन्सर, बर्थ डिफेक्ट्स आणि इंपेअर्ड इम्युनिटी सारखे आजार होऊ शकतात. म्हणून प्लास्टिक वापरणे टाळा आणि निसर्गाला वाचवा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती