रेड वाइन की व्हाईट वाइन, आपल्यासाठी कोणती योग्य? टाइप 2 मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे फायदेशीर आहे का?

बुधवार, 8 सप्टेंबर 2021 (15:18 IST)
अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की कमी प्रमाणात वाइन पिणे आपल्या हृदयासाठी आणि रक्ताभिसरण प्रणालीसाठी चांगले असू शकते. बर्‍याच अहवालांनुसार, असे पुरावे देखील आहेत की कमी प्रमाणात वाइन पिल्याने टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी होतो.
 
व्हाईट वाइन प्रामुख्याने पांढऱ्या द्राक्षांपासून बनवली जाते आणि फर्मेंटेशन प्रक्रियेच्या याचे सालं काढले जातात. तर रेड वाइन गडद लाल किंवा काळ्या द्राक्षांपासून बनविली जाते आणि फर्मेंटेशन प्रक्रिया सालांसह होते.
 
व्हाईट वाईन हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी ओळखले जाते आणि हृदयरोगाचा धोका कमी करू शकते.
 
रेड वाईनमध्ये आणखी शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट असतात ज्याला रेस्वेराट्रोल म्हणतात. हे तुमच्या रक्तवाहिन्यांचे संरक्षण करतात आणि रक्ताच्या गुठळ्या रोखू शकतात. त्याच वेळी, रेस्वेराट्रोल खराब कोलेस्टेरॉल कमी करते. चांगले कोलेस्टेरॉल वाढवतं. याचा अर्थ असा आहे की रेड वाईन रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करू शकते.
 
रेड वाईनमध्ये पॉलीफेनॉल असतात, जे वृद्धत्वाच्या परिणामांशी लढतात. दिवसातून एक किंवा दोन लाल वाइन तुम्हाला विषारी पदार्थ बाहेर काढून तरुण आणि निरोगी ठेवू शकतात.
 
रेड वाइन आणि व्हाईट वाइन कॅलरीजमध्ये समान आहेत. रेड वाइनच्या सर्व्हिंगमध्ये 125-130 कॅलरीज असतात, तर त्याच प्रमाणात व्हाईट वाईनमध्ये 121 कॅलरीज असतात.
 
व्हाईट वाईनपेक्षा रेड वाईनमध्ये सिलिकॉनचे प्रमाण जास्त असते, म्हणजे हाडांची घनता वाढते आणि ऑस्टियोपोरोसिस होण्याची शक्यता कमी होते.
 
काही अभ्यास असे सुचवतात की कमी प्रमाणात रेड वाईन पिण्याने कर्करोग होण्याचा धोका कमी होतो.
 
कमी प्रमाणात रेड वाईन पिण्यामुळे हृदय, आतडे आणि मेंदूच्या आरोग्यास प्रोत्साहन देण्यासह काही आरोग्य फायदे होऊ शकतात. याचे कारण असे की त्यात अँटिऑक्सिडंट, दाहक-विरोधी आणि लिपिड-सुधारित संयुगे असतात.
 
अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, वाइनचा वापर योग्य प्रमाणात करणे चांगलं असतं. पुरुषांसाठी दिवसातून एक ते दोन पेय आणि स्त्रियांसाठी एक पेय.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती