कोविड: मुलांची शाळेला परती,मुलांना शाळेत पाठविण्यापूर्वी अशी काळजी घ्या

सोमवार, 6 सप्टेंबर 2021 (16:06 IST)
सध्या कोरोनाचा वेग जरी मंदावला आहे ,तरी ही खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.अनेक राज्यांमध्ये शाळा पुन्हा सुरू होऊ लागल्या आहेत, त्यामुळे मुले शाळेत परत जात आहे.या परिस्थितीत मुलांसाठी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.मुलांची रोगप्रतिकारक शक्ती इतकी बळकट नसते त्यामुळे ते लवकर या व्हायरसला बळी पडू शकतात.
 
कोरोना महामारी दरम्यान मुलांना निरोगी ठेवण्यासाठी टिप्स - कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर देशात अनेक राज्यात शाळा उघडण्यास सुरुवात झाली आहे. कोरोना महामारी सुरू झाल्यापासून शाळा सतत बंद ठेवल्या गेल्या आहे आणि मुले ऑनलाईन वर्गांच्या मदतीने शिक्षण घेत आहेत. परंतु,आता अनेक राज्यांमध्ये शाळा उघडल्या जात आहेत, त्यामुळे पालकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत की शाळेत कोरोना संसर्गापासून मुलांना कसे वाचवायचे.साथीच्या रोगात सुरक्षित राहण्यासाठी त्यांना प्रशिक्षण कसे द्यावे?
 
एका संशोधनानुसार, बहुतेक मुले एका वर्षात 7-8 वेळा सर्दी-पडसाला बळी पडतात तर प्रौढांना फक्त 2-3 वेळा सर्दीचा त्रास होतो. मुलांची रोगप्रतिकारक शक्ती इतकी बळकट नसते, ज्यामुळे ते त्वरीत व्हायरस किंवा इतर रोगांना बळी ठरू शकतात.अशा परिस्थितीत, आम्ही आपल्याला काही टिप्स सांगणार आहोत ज्यांना अवलंबवून आपण आपल्या पाल्याला शाळेत गेल्यावर कोरोना संसर्गापासून वाचवू शकता. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत,त्या टिप्स-
 
1 मुलांना चांगल्या सवयींबद्दल सांगणे -मुलांना कोरोना संसर्गापासून वाचवण्यासाठी चांगल्या सवयीं बद्दल सांगणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांना कोविड -19 संसर्गापासून वाचण्यासाठी हात व्यवस्थित धुण्याची गरज का आहे समजावून सांगणे महत्वाचे आहे. त्यांना समजावून सांगा की 20 सेकंद हात चांगले धुवा आणि त्यानंतरच काहीतरी खा आणि प्या. त्यांनी हातात खोकू किंवा शिंकू नये,या साठी टिश्यू पेपर चा वापर करावा. जरी आम्ही मुलांना सर्व काही सामायिक करण्यास शिकवतो, परंतु कोरोना महामारीमध्ये, त्यांना सामायिक किंवा काहीही शेयर करू नये हे शिकवावे.जेणे करून कोरोनाचं संसर्ग पसरणार नाही. 
 
2 मुलांची नियमित तपासणी करा -मुलांची शाळा सुरू होत असेल तर पालकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.आपण नेहमी आपल्या मुलांच्या आरोग्याला महत्त्व दिले पाहिजे आणि डॉक्टरांकडून नियमित तपासणी केली पाहिजे.विशेष काळजी घ्या की मुलाला इतर अनेक रोगांपासून वाचण्यासाठी लसीकरण करणे आवश्यक आहे. यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल. ऑक्टोबर महिन्यापर्यंत मुलाला इन्फ्लूएन्झा विषाणूची लस लावायलाच हवी. जर मुलाची तब्बेत बिघडली असेल तर त्वरितच डॉक्टरांशी संपर्क साधा.    
 
3  प्रोबायोटिक्स आणि निरोगी अन्न खाऊ घाला-मुलांना बऱ्याच काळानंतर शाळेत गेल्यावर त्यांना अनेक नवीन आव्हानांना सामोरे जावे लागू शकत. म्हणून, त्याला असे प्रोबायोटिक-समृद्ध अन्न द्या जे त्याची प्रतिकारशक्ती बळकट करतील. प्रोबायोटिक्स असलेले अन्न आपल्या शरीरात चांगल्या बेक्टेरियाची संख्या वाढवून आपली पाचन प्रणाली मजबूत करते. व्हिटॅमिन डी 3 असलेले प्रोबायोटिक मुलांसाठी खूप चांगले मानले जाते. मुलांना जास्तीत जास्त निरोगी अन्न द्या .जेणेकरून त्यांची रोगप्रतिकारक शक्ती बळकट होईल आणि ते रोगांशी लढू शकतील. 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती