मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी त्यांना या 6 गोष्टी खाऊ घाला

मंगळवार, 7 सप्टेंबर 2021 (13:59 IST)
मुलं खाण्यापिण्याचा संदर्भात खूपच त्रास देतात. ज्यामुळे त्यांना पूर्ण पोषण मिळत नाही. अशा स्थितीत मुलांनी  पौष्टिक गोष्टी न खाल्ल्याने त्यांना नंतर अनेक समस्यांना सामोरी जावे लागू शकतं, त्यामुळे पालकांनी मुलांच्या आहारात अशा गोष्टींचा समावेश करणे आवश्यक आहे,ज्यामुळे मुलांची वाढ आणि प्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकते.चला,जाणून घ्या त्या कोणत्या गोष्टी आहेत- 
 
1 दूध -वाढत्या वयाच्या मुलांसाठी दूध खूप महत्वाचे आहे कारण त्यात कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते,ज्यामुळे मुलांची हाडे मजबूत होतात.तसेच दुधात जीवनसत्त्वे ए, बी 2 आणि बी 12 देखील असतात जे शारीरिक विकासासाठी आवश्यक असतात.
 
2 अंडी -वाढत्या वयाच्या मुलांसाठी अंडी खाणे फायदेशीर आहे.त्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण खूप जास्त असतात. अंड्यात व्हिटॅमिन डी, फॅट आणि आयरन असते.जे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी आवश्यक आहे.
 
3 ब्रोकोली-या मध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असत, जे मुलांची हाडे मजबूत करतात. कदाचित याची चव मुलांना आवडणार नाही.अशावेळी आपण आपल्या मुलाला सूप देऊ शकता. किंवा इतर भाज्यांमध्ये मिसळून त्याची भाजी बनवू शकता. 
 
4 ब्लू बॅरी -ही अत्यंत चवदार आणि मुलांसाठी आरोग्यवर्धक असते.या मध्ये व्हिटॅमिन  सी,आयरन,फायबर आढळतं.जे हाडे मजबूत करतात.ब्लू बेरी खाऊ घालायला आपल्याला जास्त मेहनत करावी लागत नाही,कारण याला मुलं आवडीनं खातात.
 
5 दही-दही वाढत्या मुलांसाठी एक आवश्यक गोष्ट आहे दही हाडे आणि दात मजबूत करते आणि शक्ती देखील देते. आपण आपल्या मुलाला दही लस्सीच्या स्वरूपात किंवा ताकच्या स्वरूपात देऊ शकता.
 
6 रताळे -पोषणाच्या दृष्टीने रताळ्यापेक्षा काहीही चांगले नाही.ते डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. या मध्ये  व्हिटॅमिन ए, सी, ई, कॅल्शियम,पोटॅशियम आणि आयरन असते.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती