अँजिओप्लास्टी टाळेल हे घरगुती औषध

हृदय रोग आणि हार्ट अटॅक याचे सर्वात मोठे कारण आहे आर्टरीमध्ये कोलेस्ट्रॉल साठणे. कोलेस्ट्रॉल साठल्यामुळे या आर्टरीज अरुंद होतात आणि हृदयापर्यंत पर्याप्त रक्त पुरवठा होत नाही. चरबी साठल्याने रक्त पुरवठा कमी होतो आणि तेव्हा हार्ट अटॅक येतो.
जर आपणही कोलेस्ट्रॉल पीडित आहात आणि बायपास सर्जरी किंवा अँजिओप्लास्टी अश्या प्रक्रियेत जाऊ इच्छित नसाल तर या घरगुती औषधाने आपल्या फायदा होऊ शकतो. हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करतं. 
 
जाणून घ्या हे औषध कसं तयार करायचं:

हे तयार करण्यासाठी आपल्या 5 वस्तूंची गरज पडेल: 

1. लिंबाचा रस- 1 कप
2. आल्याचा रस- 1 कप 
3. कांद्याचा रस- 1 कप 
4. मध- 3 कप 
5. सफरचंद व्हिनेगर- 1 कप 

सफरचंद व्हिनेगर घरी तयार केलेले किंवा पूर्णपणे प्राकृतिक असलं पाहिजे.

कृती- साहित्याप्रमाणे चारी रस मिसळून एका भांड्यात मंद आचेवर ठेवावे. किमान एक तास शिजवल्यानंतर हे मिश्रण 3 कप राहील तेव्हा आचेवरून काढावे. त्याला गार होऊ द्यावे. गार झाल्यावर त्यात 3 कप मध मिसळून द्यावे. आता हे मिश्रण बाटलीत काढून ठेवावे.
दर रोज सकाळी रिकाम्या पोटी 1 चमचा ह्या औषधाचे सेवन करावे. नियमित याचे सेवन केल्याने आपलं हृदय स्वस्थ राहील आणि ऑपरेशन टाळता येईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती