नारळ पाण्याचे पाच फायदे

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त
सकाळी व्यायाम झाल्यानंतर नारळ पाणी पिणे फायदेशीर ठरेल. यात आढळणारे पौष्टिक तत्त्व शरीराला रिजार्च करतात आणि हे पाणी पिण्याने भूक कमी होते. जे वजन नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त आहे.



 
 

सुंदर त्वचा आणि चमकदार केस
नारळ पाणी पिण्याने चेहर्‍यावरील पिंपल्स, पुरळ आणि डाग दूर होतात. याचे सेवन केल्याने त्वचा नितळ बनते. याव्यतिरिक्त केसांसाठी हे उत्तम कंडिशनरचे काम करतं. याने केस लांब, मुलायम आणि चमकदार होतात.


एंटीऑक्सीडेंट
नारळ पाण्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि सोडियम सारखे पोषक तत्त्व असून हे एंटीऑक्सीडेंट आहे.

पचन शक्ती
आपल्या पोटासंबंधी रोग असो अथवा बद्धकोष्ठता, नारळ पाणी पिण्याने ह्या समस्या दूर होतील. याने पचन शक्तीही वाढते.


उच्च रक्तदाब
वेस्ट इंडियन मेडिकल जर्नलप्रमाणे उच्च रक्तदाबावर नियंत्रणासाठी नारळ पाणी उपयुक्त आहे. उच्च रक्तदाब असलेल्या रूग्णांना रोज एक ग्लास नारळ पाणी प्यायला हवं.

 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती