साहित्य-
1 कप ओट्स, 250 मिलिलिटर पाणी,2 कप चिरलेले अननस,40 ग्रॅम मध,40 ग्रॅम बदाम,सुमारे 7 ग्रॅम दालचिनी, 1 कप संत्र्याचा रस.
कृती -
सर्वप्रथम ओट्स शिजवून घ्या, नंतर अननसाचे तुकडे बारीक करून त्यांचा रस घालून घ्या. त्यामध्ये दालचिनी, बदाम,मध आणि संत्र्याचे रस एकत्र ज्यूसर मध्ये काढून घ्या. या मध्ये अननस आणि ओट्स मिसळून दाटसर मिश्रण बनवा. या मध्ये बर्फ मिसळून मिक्सर मध्ये फिरवून घ्या.
व्हिटॅमिन सी, सिलिकॉन, मॅग्नेशियम आणि इतर पोषक घटकाने समृद्ध हे पेय गुडघ्यासाठी फायदेशीर आहे. एकंदरीत हे आपल्या आरोग्यासाठी ऊर्जा आणि पोषण ने परिपूर्ण आहे.