दूध पिण्यापूर्वी या 5 गोष्टींचे सेवन करू नका

बुधवार, 10 मार्च 2021 (20:00 IST)
नियमित दूध पिणे एक चांगली सवय आहे, आपल्याला दूध पिण्याचे फायदे तेव्हाच मिळतील जेव्हा याचे काही नियम माहीत असतील .खाण्यापिण्याचा काही गोष्टी अशा आहेत ज्या दूध पिण्यापूर्वी काही तास पर्यंत खाऊ नका. अन्यथा आरोग्यास त्रास होऊ शकतो.
 
1 तीळ आणि मीठ-
तीळ आणि मिठाने बनविलेले पदार्थ खाऊ नका. खात असाल तर दुधाचे सेवन करू नका. हे आपल्याला नुकसान देऊ शकते. हे खाल्ल्यावर 2 तासानंतर दुधाचे सेवन करा.
 
2 उडीद- उडीद डाळ खाल्ल्यावर दुधाचे सेवन पोट आणि आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. उडीद डाळ खाल्ल्यावर किमान 2 तासाचे अंतर ठेवा. 2 तासा नंतर दूध प्या.  
 
3 सिट्रिक फळे-
सिट्रिक रसयुक्त फळे खाल्ल्यानंतर दुधाचे सेवन करणे हानिकारक आहे. या दोन्हीचे सेवन करतांना दीर्घ अंतर असणे आवश्यक आहे.
 
4 मासे- 
जर आपण मासे खाण्याची आवड असेल तर चुकून ते खाल्ल्यावर दूध पिऊ नका. असं केल्याने आपल्याला अन्नातून विषबाधा होऊ शकते. तसेच पोटाचा इतर समस्या देखील उद्भवू शकतात.  
 
5 दही -
दही खाल्ल्यानंतर दुधाचे सेवन करू नका. अन्यथा पोटाशी निगडित इतर समस्या आणि पचनाचे त्रास उद्भवू शकतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती