कोरोना काळात बाहेर पडताना अशी काळजी घ्या

बुधवार, 3 मार्च 2021 (09:40 IST)
घराच्या बाहेर पडताना ज्या प्रकारे आपण पर्स आणि मोबाईल फोन ठेवायला विसरत नाही त्याच प्रकारे कोरोनाकाळाच्या सुरक्षितलेला  बघून घराच्या बाहेर पडताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. जे आपल्या आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊ या कोणती काळजी घ्यायला पाहिजे.     
 
1 घरातून बाहेर पडताना लक्षात ठेवा की मास्क लावायचाआहे. सार्वजनिक ठिकाणी देखील मास्क लावून ठेवायचा आहे. जेणे करून आपण या व्हायरस पासून स्वतःचे संरक्षण करू शकाल. लक्षात ठेवा की मास्क आपल्याला गर्दीच्या ठिकाणी लावायचा आहे.
 
2 लिफ्टचा वापर करताना किंवा गेट उघडण्यासाठी बोटांचा स्पर्श करणे टाळा.या साठी आपण कोपरा वापरू शकता. किंवा आपण टिशू ठेवणे अधिक सहज राहील. 
 
3 शिंकताना किंवा खोकताना आपल्या तोंडाला टिशूने झाकून घ्या. नंतर त्या टिशूला डस्टबीनमध्ये घालून द्या. 
 
4 आपल्या हाताला स्वच्छ करा. या साठी सेनेटाईझर वापरा. लक्षात ठेवा की सेनेटाईझर आपल्या जवळ बाळगा. 
 
5 सामाजिक अंतराच्या नियमांना दुर्लक्षित करू नका. लोकांपासून अंतर राखा. लक्षात ठेवा की अद्याप कोरोनाचा धोका टळला नाही.   
 
6 ज्यांना सर्दी पडसं झाले आहे त्यांच्या पासून लांब राहा. 
 
7 वारंवार चेहऱ्याला हात लावणे टाळा. बऱ्याच लोकांना आपल्या चेहऱ्याला हात लावायची सवय असते. ही सवय बदलणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. 
 
8 ऑफिसातून आल्यावर सर्वप्रथम आपले शूज घराच्या बाहेर ठेवा आणि प्रथम अंघोळीला जावं. 
 
9 आपले कपडे स्वच्छ करा. त्यांना धुऊन घ्या. नंतर कुटुंबातील कोणत्याही सदस्यांच्या संपर्कात या. अंघोळ न करता किंवा स्वतःला सेनेटाईझ न करता घराच्या इतर वस्तुंना हात लावू नका.
 
10 बाहेर जाताना पाण्याची बाटली जवळ बाळगा कारण हवामान कोणतेही असो स्वतःला हायड्रेट करणे आवश्यक आहे. घराच्या बाहेर पडताना पाण्याची बाटली जवळ बाळगा बाहेरचे पाणी पिणं आरोग्यास हानिकारक असू शकते. वॉटर कूलरचे पाणी पिणं देखील जंतू संसर्गाच्या धोक्याची शक्यता वाढवते.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती