हे करा आणि पाठदुखीपासून सुटकारा मिळवा

कित्येकदा सकाळी उठल्याबरोबर अचानक पाठीत कळ येते किंवा उसण भरते. आजकालच्या जीवनशैलीत सगळेच कधी-न-कधी पाठदुखीमुळे त्रस्त होतात. कुठलीही जखम किंवा रोग नसल्यावरही पाठदुखी 2 ते 3 दिवस बिछान्यावरून उठू देत नाही. काय आहे पाठदुखीचे कारण? जाणून घ्या यामागील कारण आणि उपाय....
 


* शिंक आली की ती पूर्ण शरीराला हालवून सोडते. त्यात आपल्याला शरीराचे भान राहत नाही आणि यामुळे स्लिप डिस्क सारखे आजार होऊ शकतात. शिंकताना पाठ आणि कंबर सरळ ठेवावी. शक्य असल्यास एक हात कंबरेवर ठेवून शिंकावे ज्याने त्यावर दबाव कमी पडेल.

एकाच पोझिशनमध्ये तासोंतास बसल्याने पाठदुखीला सामोरा जावं लागतं. कम्प्यूटरवर सतत काम केल्याने किंवा शिवणकाम करण्यासाठी मशीनीवर बसण्यानेदेखील ही तक्रार उद्भवते. तज्ज्ञांप्रमाणे सतत खुर्चीवर बसण्यार्‍या एक तासात 5 ते 10 मिनिटे फिरायला हवं.

* वेडेवाकडे झोपणेही पाठदुखीला कारणीभूत ठरू शकतात. झोपताना उंच उशी वापरल्यानेही पाठ दुखते. झोपताना उशी उंच नसावी आणि एका कुशी झोपणार्‍यांनी पायांमध्ये एक उशी दाबून झोपावे. बिछाना खूप सॉफ्ट नसला पाहिजे. जास्त सॉफ्ट बिछाना पाठीसाठी योग्य नसतो.


 
लॅपटॉप बॅग्स, मोठ्या-मोठ्या वजनदार पर्स किंवा शॉपिंग बॅग्स खांद्यावर टांगल्यानेदेखील पाठदुखीचा त्रास होतो. या वस्तू वापरताना काळजी घ्या.
 
नियमित व्यायाम आवश्यक आहे. कित्येक जणांना वजन वाढल्यामुळे पाठदुखीची सुरू होते.

वेबदुनिया वर वाचा