पाणी किती प्यावं ?

ND
ज्याचे शारीरिक श्रम अधिक आहेत अशा माणसाला पाण्याची आवश्यकता अधिक असते. जो बुद्धीजीवी माणूस वातानुकूलित वातावरणात बसून काम करतो त्याला पाण्याची आवश्यकता निश्चितच कमी आहे. थंडीच्या दिवसात दिवसाकाठी अर्धा ते एक लिटर पाणी जास्तच होतं. तेच उन्हाळ्यात हे प्रमाण वाढतं व ते योग्यच असतं.

पाण्याचं प्रमाण ठरवताना पाण्याबरोबरच चहा, कॉफी, थंड पेयं, दूध, ताक या सर्वांचा विचारही आवश्यक आहे. उन्हाळ्यामध्ये शरीराचं तापमान कायम राखण्याकरता शरीराला जादा पाण्याची आवश्यकता असते त्यावेळी थंड पाण्यानं शरीराचं तापमान नियंत्रित राहतं व मनालाही आनंद मिळतो म्हणून माठातलं गार पाणी आरोग्याला हितकर आहे. फ्रीजमधलं गार पाणी हे अर्ध साधं पाणी मिसळून घेतलं तर जास्त श्रेयस्कर. शीतकालात कोमट पाणी प्यायल्यानंतर बरं वाटतं व तहानही शमते. तंबाखूसारखं व्यसन असलेल्या माणसांना जास्त पाणी प्यावंसं वाटतं. ‍तसंच उतारवयापेक्षा लहान वयात अधिक पाणी लागतं.

वेबदुनिया वर वाचा