केळी, दूध, बदामामुळे येऊ शकते गाढ झोप

आपण असाल तर आपल्या आहारात थोडा बदल करून पाहा. केळी, बदाम, अक्रोड, दूध आणि पालक यांचा आपल्या आहारात समावेश असेल तर आपल्याला गाढ झोप लाभू शकते. निद्राविकारांविषयीचे तज्ज्ञ डॉ. सोहिर रोक्ड यांनी आपल्या 'द टायर्डनेस क्युअर' या नव्या पुस्कात याबाबतची माहिती दिली आहे. त्याचा मते पोटॅशियम, सेलेनियम आणि कॅल्शियमने युक्त असे हे खाद्यपदार्थ स्लीप हर्मोन 'मेलाटोनिन' आणि 'सेरोटोनिन' यांच्या स्त्रावाला उत्तेजना देते. त्यामुळे निद्रानाशाची समस्या दूर होऊन गाढ झोप लाभू शकते. काबुली चणे, झिंगा आणि सामन मासाही यासाठी गुणकारी आहे. या खाद्यपदार्थांमध्ये ट्रिप्टोफॅन हा घटक असतो. तो शरीरात गेल्यावर सेरोटोनिनमध्ये परिवर्तित होतो. झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी लाईट, टी.व्ही., कॉम्प्युटर बंद करावा. मोबाईल सायलंट मोडवर ठेवून झोपी जावे. चांगल्या झोपेसाठी योग आणि व्यायामही गरजेचा आहे. 

वेबदुनिया वर वाचा