आकारावरून ओळखा कोणते फळ कोणत्या अवयवासाठी फायदेशीर

राजमा
राजमा इंग्रेजीत किडनी बीन म्हणून ओळखले जाते. राजमााचे सेवन केल्याने ब्लड प्रेशर आणि मधुमेहावर नियंत्रण राहतं. एकूण हे किडनीसाठी फायदेशीर आहे.


अक्रोड
अक्रोड दिसण्यात मेंदू सारखं असतं. मेंदूत 60 टक्के फॅट असतात. म्हणून अक्रोडमध्ये असलेले ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स मेंदूसाठी उत्तम आहार आहे.


गाजर
गाजराचे स्लाइस केले की ते डोळ्यासारखे दिसतात. गाजर अ जीवनसत्त्व युक्त असल्याने हे डोळ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. भरपूर गाजर खाणार्‍यांना मोतीबिंदू आणि मंद दृष्टीची भीती नसते.


टोमॅटो
टोमॅटोमध्ये मनुष्याच्या हृदयासारखे चार चेंबर असतात. यात असलेले विटामिन्स रक्त शुद्ध करून हृदयाला निरोगी ठेवण्यात मदत करतात.

वेबदुनिया वर वाचा